कधीकाळी देवीच्या जागरणामध्ये भजनं गायची नेहा कक्कर, 'इंडियन आयडल'ने बदलले तिचे नशीब

By गीतांजली | Published: October 25, 2020 12:05 PM2020-10-25T12:05:33+5:302020-10-25T12:18:25+5:30

बॉलिवूड सिंगर नेहा कक्कर रोहनप्रीत सिंग लग्नाच्या बेडीत अडकले आहेत.

Neha kakkar and rohanpreet singh wedding here are some facts about neha | कधीकाळी देवीच्या जागरणामध्ये भजनं गायची नेहा कक्कर, 'इंडियन आयडल'ने बदलले तिचे नशीब

कधीकाळी देवीच्या जागरणामध्ये भजनं गायची नेहा कक्कर, 'इंडियन आयडल'ने बदलले तिचे नशीब

googlenewsNext

बॉलिवूड सिंगर नेहा कक्कर रोहनप्रीत सिंग लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. नेहा आणि रोहनप्रीतने गुरुव्दारामध्ये लग्न केले. दोघांच्या लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नेहाने मेंहदीपासून हळदीपर्यंतचे सगळे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आज आम्ही तुम्हाला नेहाच्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्याबाबत सांगणार आहोत. 


32 वर्षांच्या नेहाचा जन्म दिल्लीतील एका पंजाबी कुटुंबात झाला. नेहाचे वडील एका कॉलेजबाहेर समोसे विकायचे. अत्यंत हालाखीच्या परिस्थिती नेहाचे बालपण गेले. वडिलांना हातभार लावण्यासाठी नेहा आणि तिची बहीण सोनू  देवीच्या जागरणामध्ये भजनं गायच्या. यासाठी तिला केवळ 500 रुपये मिळायचे. 

इंडियन आयडलची एक स्पर्धक ते परीक्षक हा तिचा प्रवास थक्क करणार आहे. ज्या कार्यक्रमाने आपल्याला एक ओळख मिळवून दिली, त्याच कार्यक्रमात इतकी महत्त्वाची भूमिका बजावायला नेहाला मिळाली. नेहा कक्करने आपल्या करिअरची सुरुवात इंडियन आयडल या रिऑलिटी शोद्वारे केली. या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सिझनमध्ये ती एक स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. त्यावेळी ती केवळ अकरावीत शिकत होती. या कार्यक्रमाचे तिला विजेतेपद मिळवता आले नसले तरी या कार्यक्रमामुळे तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली. आज तिने तिच्या मेहनतीने बॉलिवूडमध्ये आपले एक स्थान निर्माण केले असून आँख मारे, माही वे, मिले हो तुम, बदरी की दुल्हनियाँ, मैं तेरा बॉयफ्रेंड, काला चष्मा ही तिची अनेक गाणी प्रचंड गाजली.


बॉलिवूडमध्ये एक गायिका म्हणून आपले प्रस्थ निर्माण केल्यानंतर सारेगमपा या रिअ‍ॅलिटी शोमध्ये ती परीक्षकाच्या भूमिकेत दिसली आणि त्यानंतर तिने इंडियन आयडलमध्ये परीक्षकाची भूमिका बजावली.

Web Title: Neha kakkar and rohanpreet singh wedding here are some facts about neha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.