Narcotics control bureau conducts a raid at the residence of comedian bharti singh in mumbai | प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंगच्या घरी NCBची धाड, छापेमारी दरम्यान सापडला गांजा

प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंगच्या घरी NCBची धाड, छापेमारी दरम्यान सापडला गांजा

बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात कॉमेडियन भारती सिंगच्या मुंबईच्या घरी नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) छापा टाकला आहे आणि तिच्या घरात गांजा सापडला आहे. नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या मुंबई झोनल युनिटने कॉमेडियन अभिनेत्री भारती सिंह आणि तिचा नवरा हर्ष यांच्या घरी छापा टाकला. अंधेरी, लोखंडवाला आणि वर्सोवा भागात एनसीबी छापे टाकत आहे.


एबीपी न्यूजच्या रिपोर्टनुसारपकडलेल्या  अटकेत असलेल्या ड्रग्स पॅडलरकडून मिळाल्या माहितीनुसार भारतीसिंग आणि हर्ष लिंबाचियाच्या घरी छापा टाकण्यात आला. छापा दरम्यान एनसीबीला एक संशयास्पद पदार्थ (गांजा) सापडला आहे.


बॉलिवूडमध्ये ड्रग्स प्रकरणात आतापर्यंत बऱ्याच सेलिब्रेटींची नाव समोर आली आहेत. सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीपासून दीपिका पादुकोण, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह यापासून ते अर्जून रामपाल पर्यंत अनेकांची चौकशी झाली. अजूनही एनसीबीची ही करावाई सुरु आहे. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Narcotics control bureau conducts a raid at the residence of comedian bharti singh in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.