Mrunmayee Deshpande Will Host Yuva Singer Ek Number | मृण्मयी देशपांडे 'युवा सिंगर्स'च्या मंचावर 'एक नंबर' घालणार धुमाकूळ
मृण्मयी देशपांडे 'युवा सिंगर्स'च्या मंचावर 'एक नंबर' घालणार धुमाकूळ

'युवा सिंगर, एक नंबर' या कार्यक्रमाच्या माध्यमातून वेगवेगळ्या 'एक नंबर' गोष्टी पाहण्याची प्रेक्षकांना संधी मिळणार आहे. या गाण्याच्या स्पर्धेत, गायिका सावनी शेंडेसह अभिनेता वैभव मांगले हे परीक्षकाच्या खुर्चीत बसलेले पाहायला मिळतील. या कार्यक्रमाची संकल्पना सुद्धा फार निराळी आणि आगळीवेगळी असणार आहे. महाराष्ट्रातील निरनिराळ्या भागातून आलेल्या तरुण गायकांची ही स्पर्धा नेमकी कशी असेल, हे पहिला एपिसोड पाहिल्यावरच प्रेक्षकांना कळणार आहे. संकल्पना गुलदस्त्यात असली, तरीही या कार्यक्रमाची सूत्रसंचालिका कोण आहे, हे जाणून घेताना रसिकांना नक्कीच आनंद होईल. सर्वांची लाडकी अभिनेत्री, मृण्मयी देशपांडे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहे. या अभिनेत्रीला सूत्रसंचालकाच्या भूमिकेत पाहण्याची संधी 'युवा सिंगर, एक नंबर' या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळेल.


मालिका किंवा चित्रपटांमध्ये अभिनय करण्यापेक्षा, सूत्रसंचालन अधिक आव्हानात्मक असते, हे मृण्मयी आवर्जून नमूद करते. प्रेक्षक, स्पर्धक आणि परीक्षक यांच्यातील दुवा साधण्याची कला अवगत असणे यासाठी गरजेचे असते. तिच्या सूत्रसंचलनाची पद्धत, स्वाभाविक शैली, स्पर्धकांना तिच्याकडून मिळणारे प्रोत्साहन यामुळे कार्यक्रमाची रंगत आणखी वाढणार आहे. ही भूमिका उत्तम तर्हेने पार पाडण्यासाठी व 'युवा सिंगर्स'च्या मंचावर 'एक नंबर' धुमाकूळ घालण्यासाठी ही अभिनेत्री सज्ज आहे.

ही गुणी अभिनेत्री बऱ्याच कालावधीनंतर सूत्रसंचालनाच्या भूमिकेत आपल्याला वैभव मांगले, सावनी शेंडे आणि मृण्मयी देशपांडे यांचा सहभाग असलेल्या या कार्यक्रमाविषयी प्रेक्षकांची उत्सुकता आता आणखी वाढली आहे. विशेष म्हणजे मृण्मयीचा चाहता वर्ग प्रचंड आहे. सोशल मीडियावर तिला असंख्या फॉलोव्हर्स असून ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसह संवाद साधत असते.मृण्मयी विविध फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. याआधीही तिने आपल्या सोज्वळ अंदाजाने रसिकांना घायाळ केले आहे.

English summary :
The audience will get a chance to see variety ogf singers in 'Yuva Singer Ek Number'. In the competition Sawani Shende and Vaibhav Mangle will play the role of judge and Mrunmayee Deshpande will host the show.


Web Title: Mrunmayee Deshpande Will Host Yuva Singer Ek Number

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.