mrunmayee deshpande gautami deshpande both are good singers, watch this video | मृण्मयी आणि गौतमी देशपांडे दोघीही आहेत चांगल्या गायिका, पाहा हा व्हिडिओ

मृण्मयी आणि गौतमी देशपांडे दोघीही आहेत चांगल्या गायिका, पाहा हा व्हिडिओ

ठळक मुद्देमृण्मयी आणि गौतमीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

मृण्मयी देशपांडे आणि गौतमी देशपांडे या दोन्ही बहिणी खूप चांगल्या अभिनेत्री असल्याचे त्यांनी सिद्ध केले आहे. त्या अभिनयासोबतच आणखी एका गोष्टीत अव्वल आहेत. त्या दोघीही खूप चांगल्या गायिका असून त्यांचा एक गायनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मृण्मयी आणि गौतमीचा ही वाट दूर जाते.... हे गाणे गातानाचा व्हिडिओ मृण्मयी देशपांडेने शेअर केला असून तुमच्या अभिनयासोबतच गायनाच्या आम्ही प्रेमात पडलो आहोत असे त्यांचे चाहते त्यांना सोशल मीडियाद्वारे सांगत आहेत. तसेच तुम्हाला दोघांना एकत्र गाताना पाहून आम्हाला प्रचंड आनंद होत आहे असे देखील त्यांचे चाहते त्यांना कमेंटद्वारे सांगत आहेत.

मृण्मयी आणि गौतमीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.  झी मराठीवरील ”माझा होशील ना” या मालिकेतून गौतमी देशपांडे घराघरात पोहोचली. या मालिकेत गौतमी साकारत असलेली सईची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवत गौतमीने सोनीवरील सारे तुझ्याचसाठी मालिकेतून अभिनयात पदार्पण केले. या मालिकेत तिची जोडी हर्षद आतकरीसोबत जमली होती. या मालिकेतील गौतमीच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते.

गौतमी आणि मृण्मयी दोघीही उत्तम गायिका आहे. अनेक वेळा त्या दोघी त्यांचे गाण्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. मृण्मयी आणि गौतमी यांना गाण्याचा वारसा त्यांच्या आजीकडून मिळाला आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: mrunmayee deshpande gautami deshpande both are good singers, watch this video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.