Mrunal dusani best freind is her own mobile phone | तुम्हाला माहिती आहे का, कोण आहे मृणाल दुसानिसचा बेस्ट फ्रेंड?
तुम्हाला माहिती आहे का, कोण आहे मृणाल दुसानिसचा बेस्ट फ्रेंड?

ठळक मुद्देमृणाल दुसानिसचा अजून एक बेस्ट फ्रेंड आहे आणि तो म्हणजे तिचा फोन

कलर्स मराठीवरील सुखाच्या सरींनी हे मन बावरे मालिका सध्या बरीच गाजते आहे. मृणाल दुसानिस आणि शशांक केतकर यांची जोडी देखील प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. दिवसातला बराचसा वेळ कलाकार सेट वर असतात... सेटवर कामा बरोबरच सिन्सच्या मध्ये बरीच धम्माल मस्ती देखील करतात. कधी सेल्फी काढण, गेम्स खेळण, एकत्र जेवण आणि बरच काही... यातूनच त्यांच्या मध्ये चांगली मैत्री देखील होते.

सुखाच्या सरींनी हे मन बावरे मालिकेतील सगळ्याच कलाकारांची एकमेकांशी चांगली मैत्री झाली आहे. पण, प्रेक्षकांची लाडकी अनु म्हणजेच मृणाल दुसानिसचा अजून एक बेस्ट फ्रेंड आहे आणि तो म्हणजे तिचा फोन.
 

मृणालचा फोन म्हणजे आठवणीचा साचा आहे असे म्हणायला हरकत नाही. बरेचसे जुने फोटोज तिने फोनमध्ये अजूनही तसेच ठेवले आहेत. तसेच मृणालला गेम्स खेळायला देखील आवडते ती रिकाम्या वेळेमध्ये सेटवर वा घरी दोन डॉटस आणि असे बरेच गेम्स खेळते. गेम्स म्हणजे माझ्यासाठी स्ट्रेस बस्टर आहे असे देखील ती म्हणाली. तिच्या फोन बद्दल विचारले असता ती म्हणाली, “फोन म्हणजे माझ्यासाठी सगळं काही”. माझा नवरा परदेशामध्ये आणि घरचे सगळे नाशिकला असल्याने माझा फोन माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. तसेच गेम्स बरोबर रोजच्या घडामोडी साठी न्यूजच्या वेबसाईट आणि गाणी ऐकण्यासाठी जिओ सावन आहे. सगळ्यांच माहिती आहे मृणाल सोशल मिडीयावर फारशी दिसत नाही परंतु इंस्टावर मात्र मृणाल बरीच अॅक्टिव्ह असते... बऱ्याचदा काही बातम्या तिथून देखील कळतात अस देखील ती म्हणाली.

Web Title: Mrunal dusani best freind is her own mobile phone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.