A mountain of sorrow collapsed on Divyanka Tripathi, a loved one lost due to Corona | दिव्यांका त्रिपाठीवर कोसळला दुःखाचा डोंगर, कोरोनामुळे गमावला जवळचा व्यक्ती

दिव्यांका त्रिपाठीवर कोसळला दुःखाचा डोंगर, कोरोनामुळे गमावला जवळचा व्यक्ती

देशभरात कोरोना व्हायरसची दुसरी लाट आली असून यात आतापर्यंत कित्येक लोकांचा बळी गेला आहे. टेलिव्हिजन आणि बॉलिवूडवरही त्याचा खूप मोठा परिणाम पहायला मिळाला. मुंबईतील वाढत्या कोरोनाच्या संकटामुळे १५ दिवसांचा लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे सर्व मालिका व चित्रपटांचे शूटिंग थांबवण्यात आले आहे. दरम्यान टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिची काकी राखी त्रिपाठीचे नुकतेच कोरोनामुळे निधन झाले आहे.

दिव्यांका त्रिपाठीच्या काकीचे निधन झाल्याची माहिती अभिनेत्रीची आई नीलम त्रिपाठीने सोशल मीडियावर दिली आहे. त्यांनी फेसबुक एक पोस्ट शेअर करत लिहिले की, माझ्या जाऊ राखी त्रिपाठी यांना स्वर्गवास झाला आहे. सर्वांना विनंती आहे की त्यांनी घरी रहा, सुरक्षित रहा. आतापर्यंत दिव्यांकाने या वृत्तावर कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही.

दिव्यांका त्रिपाठीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर आतापर्यंत ती क्राइम पेट्रोल शो होस्ट करत होती. महिलांवर होणाऱ्या अत्याचारावर आलेल्या सीरिजमध्ये दिव्यांका सूत्रसंचालकाची भूमिका पार पाडत होती. मात्र काही दिवसांपूर्वी दिव्यांकाने या शोचे शूटिंग संपवले आहे. याबद्दल तिने सोशल मीडियावर इमोशनल पोस्ट शेअर करून सांगितले होते.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: A mountain of sorrow collapsed on Divyanka Tripathi, a loved one lost due to Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.