कोरोना व्हायरसमुळे फक्त देशातच नाही तर जगभरात लॉकडाऊन सुरु आहे. यामुळे लोक देशा अंतर्गतल्या शहरातच नाही तर जगभरात अडकून पडले आहे. यात फक्त सामान्य नागरिकच नाहीत सेलिब्रेटीसुद्धा लॉकडाऊन संपल्यावर देशात परत यायची वाट पाहात आहेत. यात टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉयचा देखील समावेश आहे. मौना गेल्या 60 दिवसांपासून दुबईतल्या अबु धाबीमध्ये अडकली आहे. 

न्यूज 18 च्या रिपोर्टनुसार एका मॅगझिनच्या फोटोशूटसाठी अबु धाबीला गेली होती. कोरोना व्हायरस झालेल्या लॉकडाऊनमुळे गेले 2 महिने ती तिथेच आहे.

रिपोर्टनुसार एका मुलाखती दरम्यान मौनी म्हणाली, फोटोशूट संपल्यानंतर मी एक-दोन आठवडे आणखी इथेच राहण्याचा निर्णय घेतला. कारण पुढचा प्रोजेक्ट 15 एप्रिलला सुरु होणार होता. मात्र मला याची अजिबात कल्पना नव्हती की जगभरात लॉकडाऊन घोषित करण्यात येईल आणि मी इथेच अडकून पडेन.

रिपोर्टनुसार, मौनी फक्त 4 दिवसांचे कपडे स्वत:सोबत घेऊन आली होती. लॉकडाऊनमध्ये मौनीला तिच्या कुटुंबीयांची चिंता सतावते आहे.  मौनीचे कुटुंबीय बिहारमधील कूचमध्ये राहतात. ती त्यांच्याशी रोज फोनवरुन संपर्कात आहे. लवकरात लवकर मौनीला भारतात परतायचे आहे. 

Web Title: Mouni roy has been stuck in abu dhabi for the last 2 months gda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.