Monalisa is big fan of Kulfi | मोनालिसा कुल्फीची खूप मोठी चाहती

मोनालिसा कुल्फीची खूप मोठी चाहती

ठळक मुद्देआकृती गुणी मुलगी आहे - मोनालिसा

स्टार प्लसवरील ‘नजर’ मालिकेतील आपल्या भूमिकेने अभिनेत्री मोनालिसाने अल्पावधीतच स्वत:चा फार मोठा चाहता वर्ग निर्माण केला आहे. पण स्वत: मोनालिसा ही कुणाची चाहती आहे, हे तुम्हाला ठाऊक आहे? 


नजर मालिकेत मोनालिसाने मोहोना या डायनची भूमिका साकारली असून त्यातील तिचे रूप हे तिच्या आजवरच्या सर्व भूमिकांपेक्षा अगदीच भिन्न आहे. दररोज उत्कृष्ट कामगिरी करण्याची प्रेरणा तिला कोठून मिळते, या प्रश्नावर ती म्हणाली, “मी स्वत: आकृतीची (कुल्फी) मोठी चाहती आहे. ती फक्त आठ वर्षांची मुलगी आहे पण ती इतकी गुणी आहे. पडद्यावर तिला रडताना पाहिले की मलाही रडू फुटते. ती सर्व काही इतक्या उत्तम प्रकारे पार पाडते की मला ती फारच आवडते.”
‘कुल्फीकुमार बाजेवाला’ आणि ‘नजर’ या दोन्ही मलिकांचे चित्रीकरण गेल्या काही दिवसांपासून लगतच्या स्टुडिओमध्ये होत असल्याने चित्रीकरणामधील मोकळ्या वेळेत मोनालिसाला आकृतीची भेट घेता येते. मोनालिसा म्हणते, “ती जेव्हा जेव्हा आमच्या सेटवर चित्रीकरण करीत असते, तेव्हा ती मला येऊन भेटते. मलाही तिला भेटायला आवडते आणि ती माझीच मुलगी आहे, असे मला वाटते.”
आकृती म्हणाली, “मोनालिसादीदी ही फारच गोड स्वभावाची असून मला तिच्याबरोबर वेळ व्यतीत करायला आवडते. माझी आई सेटवर नसते, तेव्हा ती माझी खूप काळजी घेते.”
 

Web Title: Monalisa is big fan of Kulfi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.