Mithun Chakraborty's glamorous gold is being discussed on social media, watch this video of her | मिथुन चक्रवर्ती यांच्या सूनेच्या ग्लॅमरस अदांची सोशल मीडियावर होतेय चर्चा, पहा तिचा हा व्हिडीओ

मिथुन चक्रवर्ती यांच्या सूनेच्या ग्लॅमरस अदांची सोशल मीडियावर होतेय चर्चा, पहा तिचा हा व्हिडीओ

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची सून मदालसा शर्मा सध्या छोट्या पडद्यावर झळकते आहे. सध्या ती स्टार प्लस वाहिनीवरील मालिका अनुपमामध्ये अभिनय करते आहे. या मालिकेत तिने काव्याची भूमिका साकारली आहे. मदालसा खूप ग्लॅमरस आणि सुंदर आहे. मदालसा शर्माने बऱ्याच प्रादेशिक भाषेतील चित्रपटात काम केले आहे. मिथुन चक्रवर्ती यांची सून मदालसाने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला चाहत्यांची खूप पसंती मिळते आहे. तिच्या फॅशन सेन्सची खूप चर्चा आहे.

मदालसा शर्माने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ती रेड साडीमध्ये दिसते आहे. या व्हिडीओत ती करीना कपूर आणि सैफ अली खान यांच्यावर चित्रीत झालेले गाणे शुक्रान अल्लाह गाण्यावर अदा दाखवताना दिसते आहे. या व्हिडीओला चाहत्यांची खूप पसंती मिळते आहे.


मदालसाचा जन्म अभिनय क्षेत्राशी निगडीत असलेल्या कुटुंबात झाला आहे. ती बीआर चोप्रा यांची मालिका महाभारतमध्ये देविकाची भूमिका साकारणारी अभिनेत्री शीला शर्मा आणि निर्माते व दिग्दर्शक सुभाष शर्मा यांची मुलगी आहे.

मदालसाचे लग्न मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा मिमोहसोबत झाले आहे. मदालसा तेलगू सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Mithun Chakraborty's glamorous gold is being discussed on social media, watch this video of her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.