मिका सिंगने 'रायझिंग स्टार 3'च्या स्पर्धकाला तिचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी केली मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2019 03:34 PM2019-04-20T15:34:36+5:302019-04-20T15:40:06+5:30

एक सेलिब्रिटी गेस्ट म्हणून उपस्थित असलेल्या मिकाने ड्यएल्स की टक्करमध्ये पुढच्या राऊंड मध्ये सलामतच्या विरोधात पूजा निवड केली जाईल अशी आशा व्यक्त केली.

Mika Singh helped the contestants of 'Raising Star 3' to complete Her Education | मिका सिंगने 'रायझिंग स्टार 3'च्या स्पर्धकाला तिचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी केली मदत

मिका सिंगने 'रायझिंग स्टार 3'च्या स्पर्धकाला तिचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी केली मदत

googlenewsNext

नेहमीच  एका मेकान मागे टाकून पुढे धावणारी नगरी म्हणून बॉलीवूडची ओळख .... चुकुनच इथे कोण कोणाला आधार देतो .... मग ते अभिनयाचे क्षेत्र असो वा संगीताचे क्षेत्र ....  मदत मिळणे तेवढेच कठीण... मिका सिंगने मनाचा मोठेपणा दाखवत रायझिंग स्टार 3च्या स्पर्धकाला तिचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी मदत केली नुकत्याच झालेल्या कलर्सच्या 'रायझिंग स्टार 3'च्या कोलकत्यातील स्पर्धक पूजाने मिका सिंगला तिच्या रसाळ आवाजाने प्रभावित केले.

 

एक सेलिब्रिटी गेस्ट म्हणून उपस्थित असलेल्या मिकाने ड्यएल्स की टक्करमध्ये पुढच्या राऊंड मध्ये सलामतच्या विरोधात पूजा निवड केली जाईल अशी आशा व्यक्त केली. प्रेक्षकांचा विचार वेगळा होता आणि त्यामुळे पूजा मागे पडली.  

 

पूजाशी बोलताना, मिकाला कळून चुकले की तिला पुढे शिकण्याची इच्छा आहे पण तिच्या आर्थिक परिस्थिती मुळे ती तसे करू शकत नाही. तिची कथा ऐकल्यानंतर, मिका भावुक झाला आणि त्याने लगेच तिला आर्थिक मदत करण्याचे वचन दिले. केवळ आर्थिक अडचणींमुळे तिला शिक्षण किंवा संगीत सोडावे लागणार नाही. 

यावर बोलताना, मिका सिंगने सांगीतले, “जबाबदारीचे ओझे न घेता स्पर्धकांनी त्यांची स्वप्ने पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा असे मला वाटते. ही तर एक छोटी मदत आहे. जी मी त्यांच्या शो वरील बेस्ट परफॉर्मन्ससाठी देत आहे. सलामत त्याच्या पत्नीला शिकवू इच्छित आहे तर पूजा पुढील शिक्षण घेऊ इच्छित आहे. मी पूजा आणि सलामतची पत्नी दोघींनाही त्यांच्या पुढील शिक्षणासाठी मदत करत आहे”.  
 

Web Title: Mika Singh helped the contestants of 'Raising Star 3' to complete Her Education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.