Mere dad ki dulhan actress shweta tiwari on abhinav kohli relationship and marriage | दुसरं लग्न तुटल्यावर भावूक झाली टीव्हीवरील ही संस्कारी बहू, बोल्ड सीन्समुळे होती चर्चेत
दुसरं लग्न तुटल्यावर भावूक झाली टीव्हीवरील ही संस्कारी बहू, बोल्ड सीन्समुळे होती चर्चेत

 गेल्या वर्षभरापासून श्वेता तिवारी पती अभिनय कोहलीसोबत होत असलेल्या वादाला घेऊन चर्चेत आहे. श्वेताने अभिनयच्या विरोधात घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता. अमर उजालाच्या रिपोर्टनुसार श्वेताने दिलेल्या एका मुलाखती दरम्यान खुलासा केला की, लग्नानंतर एक वेळ अशी आली की तू पूर्णपणे कोलमडून पडली.

दुसरं लग्न संपुष्टात आल्यानंतर श्वेताला अनेक वेळा सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले. यावर बोलताना श्वेता म्हणाली, ही ती लोक आहे ज्यांना आयुष्यात करण्यासाठी काहीच काम नाही आहे. जे लोक बिझी त्यांच्याकडे दुसऱ्याला ट्रोल करायला वेळ नसतो. आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत बोलताना श्वेता पुढे म्हणाली,  मी बिनधास्त नाही आहे, मी खूप हळवी आहे. या सगळ्या संकटांचा सामना करण्याचा प्रयत्न मी करतेय. मी रडते, कमजोर होते आणि मग विचार करते हे सगळं स्वाभाविक आहे. 


श्वेता सध्या वरुण वडोलासोबत ‘मेरे डॅड की दुल्हन’या मालिकेत दिसतेय.  ‘मेरे डॅड की दुल्हन’ ही मालिका वडील व मुलीच्या नात्यावर आधारित आहे. काही दिवसांपूर्वी श्वेता ‘हम तुम अ‍ॅण्ड देम’ या वेब सीरिजमुळे चर्चेत आली होती. या वेबसीरिजमध्ये श्वेताने कधी नव्हे इतके बोल्ड सीन्स दिले आहेत. या वेब सीरिजचा ट्रेलर रिलीज झाला होता. या ट्रेलरमधील श्वेताचा बोल्ड अवतार पाहून अनेकांना धक्का बसला होता. या ट्रेलरमध्ये श्वेता अनेक लिपलॉक सीन्स देताना दिसली होती. 

Web Title: Mere dad ki dulhan actress shweta tiwari on abhinav kohli relationship and marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.