Meet Mazhya Navryachi Bayko Fame Anita Date Real Life Partner, You Will Be Amazed To know her Real Life Story | भेटा राधिकाच्या खऱ्या आयुष्यातील जोडीदाराला, लग्नाआधीच पार्टनरसोबत राहायची लिव्ह इनमध्ये

भेटा राधिकाच्या खऱ्या आयुष्यातील जोडीदाराला, लग्नाआधीच पार्टनरसोबत राहायची लिव्ह इनमध्ये

'माझ्या नवऱ्याची बायको'मधील राधिकाने तिच्या अभिनयकौशल्यामुळे आणि नागपुरी ठसक्याच्या बोलण्याने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. मालिकेत नवऱ्याच्या कुरापतींनी कंटाळलेली राधिका अशी दाखवण्यात आली होती. राधिका अर्थात अनिता दाते केळकर खऱ्या आयुष्यात मात्र बिनधास्त आहे. अनिताची ख-या आयुष्यातील लव्हस्टोरीही भन्नाट आहे.


अनिताचे लग्न चिन्मय केळकरसोबत झाले असून चिन्मय देखील याच क्षेत्राशी संबंधित आहे. तो अनेक वर्षांपासून अनुराग कश्यपसोबत काम करत असून तो एक लेखक आहे. ललित केंद्रात असतानाच चिन्मय आणि अनिताची ओळख झाली होती. पण त्यावेळी केवळ ते फ्रेंड्स होते. पण एका नाटकाच्या दरम्यान ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. सिगारेट्स या नाटकाच्या तालमीच्या वेळी ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले असल्याची त्यांना जाणीव झाली. पण चिन्मयला लग्न करायचे नव्हते आणि त्याने ही गोष्ट स्पष्टपणे अनिताला सांगितली होती. त्यामुळे त्या दोघांनी लिव्ह इन मध्ये राहायला सुरुवात केली. दीड वर्षं ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात होते. त्यानंतर त्या दोघांनी लग्न करायचे ठरवले. आता त्यांच्या लग्नाला अकरा वर्षांहून अधिक काळ झालेला आहे.

अनिताने तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात खूप छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. एका लग्नाची तिसरी गोष्ट या मालिकेत स्पृहा जोशीच्या मैत्रिणीच्या भूमिकेत ती दिसली होती. या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. त्यानंतर ती 'हलकं फुलकं' या नाटकात सागर कारंडेसोबत झळकली होती. एवढेच नव्हे तर राणी मुखर्जीच्या 'अय्या' या चित्रपटात देखील तिने एक छोटीशी भूमिका साकारली होती. 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतील भूमिकेमुळे तिच्या संपूर्ण करियरला कलाटणी मिळाली असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही.
 

Web Title: Meet Mazhya Navryachi Bayko Fame Anita Date Real Life Partner, You Will Be Amazed To know her Real Life Story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.