मीरा जोशीचे २ वर्षानंतर छोट्या पडद्यावर कमबॅक, 'बायको अशी हव्वी'मध्ये दिसणार आव्हानात्मक भूमिकेत

By तेजल गावडे | Published: May 18, 2021 01:39 PM2021-05-18T13:39:21+5:302021-05-18T13:39:52+5:30

तब्बल दोन वर्षानंतर मीरा जोशी छोट्या पडद्यावर पुनरागमन करते आहे.

Meera Joshi's comeback on small screen after 2 years, challenging role in 'Baiko Ashi Havvi' | मीरा जोशीचे २ वर्षानंतर छोट्या पडद्यावर कमबॅक, 'बायको अशी हव्वी'मध्ये दिसणार आव्हानात्मक भूमिकेत

मीरा जोशीचे २ वर्षानंतर छोट्या पडद्यावर कमबॅक, 'बायको अशी हव्वी'मध्ये दिसणार आव्हानात्मक भूमिकेत

Next

छोट्या पडद्यावरील मालिका 'तुझं माझं ब्रेकअप'मधून मेनका नामक ग्रे शेड भूमिका साकारून घराघरात पोहचलेली अभिनेत्री व नृत्यांगना मीरा जोशी सोशल मीडियावरील फोटोंमुळे नेहमी चर्चेत असते. मात्र आता ती वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. तब्बल दोन वर्षानंतर मीरा जोशी छोट्या पडद्यावर पुनरागमन करते आहे. ती कलर्स मराठी वाहिनीवर दाखल झालेली नवीन मालिका बायको अशी हव्वीमध्ये राखीच्या भूमिकेत दिसणार आहे. 


या मालिकेबद्दल मीरा जोशीने सांगितले की, आतापर्यंत मालिकेत मी निगेटिव्ह भूमिका केल्या आहेत. मी डान्सर आहे. मला डान्स करायला खूप आवडतं. आतापर्यंत भूमिका केल्या आहेत तिथे थोडीफार डान्सला वाव मिळाली होती. मात्र या मालिकेत एका पायाने अधू असलेल्या तरूणीची भूमिका साकारताना मी दिसणार आहे. त्यामुळे माझ्यासाठी ही खूप चॅलेंजिंग भूमिका आहे. 


बायको अशी हव्वी मालिकेत अभिनेता विकास पाटील विभासची भूमिका साकारतो आहे. तर मीरा राखीच्या भूमिकेत दिसणार आहे. विभास आणि राखी बालपणापासूनचे फ्रेंड्स आहेत.  या मालिकेबद्दल जाणून घेण्यासाठी तुम्हाला ही मालिका पहावी लागेल.


राखीची भूमिका खूप फन लव्हिंग आहे. ती अपंग असल्याचे तिला अजिबात दुःख वाटत नाही. ती खूप स्वच्छंदी आणि पॉझिटिव्ह असल्याचे मीराने सांगितले. या मालिकेतील अनुभवाबद्दल की म्हणाली की,  विरेन प्रधान प्रोडक्शनसोबत मी पहिल्यांदाच काम करते आहे. या प्रोडक्शनबद्दल मी खूप चांगल्या गोष्टी ऐकल्या होत्या आणि आता त्या मी अनुभवते आहे. कुटुंबाप्रमाणे ते कलाकार आणि सर्वांची काळजी घेतात. या मालिकेत प्रदीप वेलणकर सर आणि बरेच दिग्गज कलाकार या मालिकेत आहेत. त्यांच्यासोबत काम करायला मजा येते आहे. या मालिकेत काम करण्यासाठी मी खूप उत्सुक आहेत. दोन वर्षांनी मालिकेत काम करायला मिळतेय खूप छान वाटते आहे. मालिकेतून घराघरात पोहचता येते. त्यामुळे मालिकेत मी साकारलेली राखी प्रेक्षकांना नक्कीच आवडेल, अशी मला आशा आहे.


मीरा जोशीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर तिची  इंदौरी इश्क आणि ऑरेंज लिली ही वेबसीरिज लवकरच भेटीला येणार आहे. तसेच तिने वृत्ती चित्रपटातही काम केले आहे. हा चित्रपटही रिलीजच्या वाटेवर आहे. याशिवाय तिची काही गाणीही प्रदर्शित होणार आहेत. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Meera Joshi's comeback on small screen after 2 years, challenging role in 'Baiko Ashi Havvi'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app