Mazya Navryachi Bayko Mihir Nishith Rajda Wife Alos Popullar Actor In Tv Industry looks very beautiful | 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेतील आनंदची बायको आहे प्रसिद्ध अभिनेत्री, सिनेमाला साजेअशी अशी आहे त्याची Lovestory

'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेतील आनंदची बायको आहे प्रसिद्ध अभिनेत्री, सिनेमाला साजेअशी अशी आहे त्याची Lovestory

छोट्या पडद्यावर 'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिकेतील सर्वच भूमिका रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहेत. गुरू, राधिका, शनाया, जेनी या भूमिकेप्रमाणे काही पात्र विशेष लक्षवेधी तसंच रसिकांच्या काळजात घर करून आहेत. यांत रेवती, गुप्ते, गुरूचे आई-बाबा, अथर्व, श्रेयस, पानवलकर, सौमित्र, नाना, नानी, केडी, शनायाची आई, आनंद ही पात्रंही रसिकांच्या परिचयाची झाली आहेत. आधी गुरुनाथच्या आणि आता राधिकाच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या स्टाफपैकी दोघं म्हणजे आनंद आणि जेनी. मालिकेत आनंद आणि जेनीच्या जीवनातील नवा टप्पा सुरू होत असल्याचे पाहायला मिळत आहे.  दोघांचेही लग्न झाले असून जेनी आता लवकरच बाळाला जन्म देणार आहे असे  मालिकेत दाखवण्यात आले आहे. 

मालिकेतील आनंद गुजराती दाखवण्यात आला आहे. मात्र प्रत्यक्ष जीवनातही आनंद गुजराती असून त्याचे नाव मिहीर निशीथ राजदा असं आहे. मुंबईत जन्म झाला असल्यामुळे आनंद ही भूमिका साकारताना चांगल्या पद्धतीने मराठी बोलतो. मिहीरने मुंबई विद्यापीठातून कॉमर्सची पदवी घेतली आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना तो एकांकिकांमध्ये सहभागी होऊ लागला. त्याचा अभिनय पाहून मित्रांनी त्याला याच क्षेत्रात करिअर करण्याचा सल्ला दिला. मित्रांमुळेच त्याला व्यावसायिक नाटकंसुद्धा मिळाली. महाविद्यालयीन जीवनातील मिहारचे फोटो पाहिल्यास हाच का तो मिहीर असा प्रश्न कुणालाही पडेल.

माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतील आनंद आणि मिहीर राजदा यांची प्रेमकहाणी काहीशी मिळतीजुळती आहे.  मिहीरने रिअल लाइफमध्ये घरच्यांच्या परवानगीने मराठी मुलीशी प्रेमविवाह केला आहे. मिहीर राजदा आणि नीलम पांचाळ २०१० साली रेशीमगाठीत अडकले. या दोघांच्या आयुष्यात २०१३ साली एका गोंडस मुलीचं आगमन झालं. मिहीर आपल्या कुटुंबासह नवी मुंबईत राहतो. 

 

 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Mazya Navryachi Bayko Mihir Nishith Rajda Wife Alos Popullar Actor In Tv Industry looks very beautiful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.