'माझ्या नवऱ्याची बायको' फेम शनाया उर्फ ईशा केसकर खऱ्या आयुष्यात आहे खूप बोल्ड, पहा तिचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2020 11:23 AM2020-02-25T11:23:22+5:302020-02-25T11:24:04+5:30

Mazya Navryachi Bayko Serial : शनया म्हणजेच ईशा केसकर मालिकेत जितकी बोल्ड आणि ग्लॅमरस दिसते खऱ्या आयुष्यात देखील ती तितकीच ग्लॅमरस आहे.

Mazya Navryachi Bayko fame Shanaya Aka Isha Keskar is bold and glamrous in real life | 'माझ्या नवऱ्याची बायको' फेम शनाया उर्फ ईशा केसकर खऱ्या आयुष्यात आहे खूप बोल्ड, पहा तिचे फोटो

'माझ्या नवऱ्याची बायको' फेम शनाया उर्फ ईशा केसकर खऱ्या आयुष्यात आहे खूप बोल्ड, पहा तिचे फोटो

googlenewsNext


झी मराठी वाहिनीवरील माझ्या नवऱ्याची बायको मालिकेने अल्पावधीतच रसिकांच्या मनावर छाप उमटविली आहे. या मालिकेसोबतच या मालिकेतील मुख्य पात्रांनीदेखील रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केले. आहे. 
गोड संसारासाठी थोडं तिखट व्हावं लागतं' असं म्हणत जवळपास ३ वर्षांपूर्वी सुरु झालेली 'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका रसिकप्रेक्षकांच्या मनावर अक्षरशः राज्य करतेय.

आजवर टीआरपीचे नवे उच्चांक या मालिकेने प्रस्थापित केले आहेत.आपल्या नवऱ्यावर मनापासून प्रेम करणारी, 'स्वावलंबी' राधिका, राधिकाच्या नवऱ्याला आपल्या तालावर नाचवणारी 'नखरेल' शनाया आणि राधिका-शनायाच्या कचाट्यात सापडलेला गुरुनाथ, या तिघांची अफलातून केमिस्ट्री हेच या मालिकेच्या यशाचं गमक आहे.


या मालिकेतील शनया म्हणजेच ईशा केसकर मालिकेत जितकी बोल्ड आणि ग्लॅमरस दिसते खऱ्या आयुष्यात देखील ती तितकीच ग्लॅमरस आहेत. सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय असलेल्या ईशानं इन्स्टाग्रामवर काही फोटो तिच्या चाहत्यांसाठी शेअर केले आहेत. तिच्या या फोटोजवर चाहते भरभरून प्रतिसाद देत आहेत. तिचा बोल्ड आणि ग्लॅमरस अवतार चाहत्यांना प्रचंड भावला आहे असं म्हंटल तर खोटं ठरणार नाही.

ईशा अभिनयावर जितकी मेहनत घेते, तितकीच मेहनत ती फिटनेससाठीही घेते. 


त्याबद्दल बोलताना ईशा म्हणाली, "चित्रीकरणाच्या या बिझी शेड्युलमध्ये फिट राहण्यासाठी खूप काही करायला मिळत नाही. मात्र मला वेळ मिळतो तेव्हा मी जिमला जाते, तसेच चालायला आणि पळायला जायला मला फार आवडते. त्यामुळे मला जास्त ताजेतवाने वाटते.

झी मराठी वाहिनीवरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतील शनाया ही भूमिका मी साकारली तेव्हा मला तब्बल ११ किलो वजन कमी करावे लागले. ही भूमिका स्वीकारल्यानंतर माझ्या शरीरयष्टीमध्ये झालेल्या बदलात मी किंचितसाही फरक पडू दिला नाही. याचे कारण म्हणजे व्यायाम आणि उत्तम डाएट."

Web Title: Mazya Navryachi Bayko fame Shanaya Aka Isha Keskar is bold and glamrous in real life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.