mazhya navryachi bayko fame Abhijeet Khandkekar wife Sukhada Khandkekar writes post | आम्हाला गुरुनाथ/गॅरी दिल्याबद्दल थँक्यू...! अभिजीत खांडकेकरसाठी बायकोने लिहिली पोस्ट

आम्हाला गुरुनाथ/गॅरी दिल्याबद्दल थँक्यू...! अभिजीत खांडकेकरसाठी बायकोने लिहिली पोस्ट

ठळक मुद्दे‘ माझ्या नवऱ्याची बायको’ मालिका सुरुवातीच्या काळापासून टीआरपीच्या रेसमध्येही अव्वल स्थानावर होती. मात्र, गेल्या काही दिवसांत ही मालिका मूळ ट्रॅकपासून बरीच भरकटली होती.

छोट्या पडद्यावरची ‘ माझ्या नवऱ्याची बायको’ ही लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार, अशी अनेक दिवसांपासून चर्चा होती. अखेर निरोपाची वेळ आलीच. आज 7 मार्चला या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होत आहे. या पार्श्वभूमीवर ‘ माझ्या नवऱ्याची बायको’तील गुरुनाथ उर्फ गॅरी अर्थात अभिजीत खांडकेकर याची रिअल लाईफमधील बायको सुखदा खांडकेकर हिने एक भावूक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.
अभिजीतसोबतचा फोटो शेअर करत सुखदाने लिहिले, ‘ तर  माझ्या नवऱ्याची बायको  या मालिकेचा आज शेवटचा भाग प्रसारित होतोय. अभि... साडे चार वर्षे आणि 1375 वर एपिसोड... याबद्दल मला तुझा अभिमान वाटतो, आता तर हा अभिमान आणखी वाढला आहे. कामाप्रतीची तुझी निष्ठा, तुझा त्याग, प्रक्रियेवरचा तुझा विश्वास आणि सातत्य हे सगळे अफाट आणि अकल्पनीय आहे. आम्हाला हा प्रेमळ गुरूनाथ/ गॅरी दिल्याबद्दल आभार. ही भूमिका त्याच्याइतकी इतकी सहज, सुंदर कोणीच वठवू शकले नसते. त्याला प्रेक्षक नक्कीच मिस करतील...’  

‘ माझ्या नवऱ्याची बायको’ अभिजीत खांडकेकरने गुरुनाथ उर्फ गॅरीची भूमिका साकारली होती.  मालिकेचा पहिला भाग 22 आॅगस्ट 2016 रोजी प्रसारित झाला होता. तेव्हापासून गेल्या पाच वर्षांत या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केले आहे. विशेष म्हणजे मालिकेतील सगळ्याच कलाकारांच्या भूमिकांनी रसिकांची मनं जिंकली. गुरुनाथ, शनाया, राधिका यांच्यातील जुगलबंदी रसिकांना कायमच भावली.या मालिकेतील प्रत्येक व्यक्तीरेखा रसिकांच्या मनात घर करण्यात यशस्वी ठरली आहे.

‘ माझ्या नवऱ्याची बायको’ मालिका सुरुवातीच्या काळापासून टीआरपीच्या रेसमध्येही अव्वल स्थानावर होती. मात्र, गेल्या काही दिवसांत ही मालिका मूळ ट्रॅकपासून बरीच भरकटली होती. त्यामुळे प्रेक्षक नाराज झाले होते. त्यामुळेच आता निर्मात्यांनी ही मालिका गुंडाळण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: mazhya navryachi bayko fame Abhijeet Khandkekar wife Sukhada Khandkekar writes post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.