'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेतील ही अभिनेत्री खऱ्या आयुष्यात बनलीय पायलट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2021 04:00 PM2021-08-21T16:00:16+5:302021-08-21T16:03:39+5:30

'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेत विशेषतः राधिका आणि शनायाची जुगलबंदी रसिकांना भावली होती.निगेटिव्ह भूमिका असली तरी त्यातही आपल्या हटके अंदाजात रसिका सुनील हिने शनाया साकारली होती.

Mazhya Navraychi Bayko's fame Rasika Sunil became Pilot in real life, check her interesting story | 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेतील ही अभिनेत्री खऱ्या आयुष्यात बनलीय पायलट

'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेतील ही अभिनेत्री खऱ्या आयुष्यात बनलीय पायलट

Next

कलाकार मंडळी अभिनयासह इतर गोष्टींमध्येही तितकेच पारंगत असतात. वैयक्तिक आयुष्यात अभिनयासह निरनिराळ्या गोष्टी करणं कलाकारांना आवडतं.  प्रत्येक कलाकाराला जीवनात काही ना काही छंद असतो. 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकांमधून घराघरांत पोहचलेली अभिनेत्री रसिका सुनिलनेही अभिनयाव्यतिरिक्त एका गोष्टीची आवड असल्याचे समोर आले होते. उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत असताना रसिकाने विमान उडवण्याचेही धडे गिरवले.सोशल मीडियावर तिचा फोटो शेअर करत आपल्या चाहत्यांना ही माहिती दिली होती.अनेकांना हे बघून आश्चर्याचा धक्काच बसला होता.

रसिका सोशल मीडियावरही प्रचंड सक्रीय असते. सोशल मीडियावर ती प्रचंड लोकप्रिय आहे. तिचे व्हिडीओ फोटो शेअर करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. सध्या तिच्या रिलेशनशिपमुळे ती प्रचंड चर्चेत असते. रोमँटीक फोटो शेअर करत वाहवा मिळवत असते. रसिकांने अल्पावधीतच रसिकांची पसंती मिळवली होती.  

'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेत विशेषतः राधिका आणि शनायाची जुगलबंदी रसिकांना भावली होती.निगेटिव्ह भूमिका असली तरी त्यातही आपल्या हटके अंदाजात रसिका सुनील हिने शनाया साकारली होती. रसिका सुनीलने 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेव्यतिरिक्त गर्लफ्रेंड, बसस्टॉप आणि बघतोस काय मुजरा कर या सिनेमातही काम केले आहे.

रसिका आदित्य बिलागीला डेट करत आहे. दोघांनीही त्यांचे अफेअर जगापासून लपवून न ठेवता. प्रेमाची जाहीर कबुली दिली होती. त्यानंतर दोघेही त्यांचे रोमँटीक फोटो शेअर करत कपल गोल देत असतात.

 

दोघांमध्ये खूप चांगली केमिस्ट्री पाहायला मिळते. सध्या रसिका तिच्या लव्हलाईफमुळेच जास्त चर्चेत असते. सोशल मीडियावर नजर टाकल्यास दोघांचेही विविध अंदाजातील फोटो तुम्हाला पाहायला मिळतील.
 

Web Title: Mazhya Navraychi Bayko's fame Rasika Sunil became Pilot in real life, check her interesting story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app