Maza hoshil na serial release to swarajya rakshak sambhaji on zee marathi | ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिकेची जागा घेणार ही मालिका, वाचा सविस्तर  
‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिकेची जागा घेणार ही मालिका, वाचा सविस्तर  

जवळपास गेली दोन वर्षं प्रेक्षकांच्या हृदयाचा ठाव घेणारी ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असून या मालिकेचा शेवट जवळ आला आहे. 2018 ला सुरु झालेल्या या मालिकेने रसिकांच्या मनावर जवळपास 2 वर्षे अधिराज्य गाजवले. या मालिकेतून संभाजी महाराजांच्या जीवनावरील महत्त्वाच्या घडामोडींसोबतच बारीकसारीक प्रसंगांवर प्रकाश टाकण्यात आला.फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे. प्रेक्षकांची ही आवडती मालिका बंद झाल्यानंर या मालिकेची जागा कोणती मालिका घेणार याची उत्सुकता प्रेक्षकांना होती. 

'माझा होशील ना' ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या मालिकेचा प्रोमो झी मराठी वाहिनीवर प्रसारित झाला. या मालिकेत अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिची बहीण गौतमी देशपांडे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सुनील तावडे, विनय येडेकर, निखिल रत्नपारखी, अच्युत पोतदार असे अनेक ज्येष्ठ कलाकार या प्रोमोमध्ये दिसतायेत.

प्रोमोवरून ही लव्हस्टोरी असल्याचं पाहायला मिळत असून प्रेक्षक या नव्या मालिकेसाठी उत्सुक आहेत. संभाजी मालिका नेहमीच टीआरपीच्या रेसमध्ये अव्वल स्थानावर राहिली आहे त्यामुळे माझा होशील ना ही मालिका हे स्थान टीआरपीच्या रेसमध्ये कायम राखेल का?, हे पाहणं उत्सुकतेचे ठरणार आहे.  

Web Title: Maza hoshil na serial release to swarajya rakshak sambhaji on zee marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.