लोकप्रिय  'जीव झाला येडापिसा'  या मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील व्यक्तिरेखांवर संबंध महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करतात. अल्पावधीतच ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. मालिका सुरू होताच संपूर्ण महाराष्ट्राचा जीव यांवर जडला... प्रेक्षकांची मने मालिकेतील सर्वच पात्रांनी जिंकली आहेत.

 

अल्पावधीच या मालिकेने छोट्या पडद्यावर अक्षरशः धुमाकूळ घालत रसिकांचे भरभरून मनोरंजन करण्यास सुरुवात केली. मालिकेचा वेगळा विषय, कलाकार मंडळींचा जलवा या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांच्या लाडक्या ठरल्या आगामी काळातही  या मालिकेत एका अनोखं वळण येणार आहे. जे रसिकांना आणखी खिळून ठेवण्यात यशस्वी होणार असा मालिकाच्या टीमला विश्वास आहे. 

तुर्तास द्वेषातून सुरू झालेलं शिवा सिध्दीचे नाते प्रेमाने बहरलं... कठीण परिस्थितीला या दोघांनी खंबीरपणे, मोठ्या धीराने तोंड दिले... अनेक आव्हानं, कसोट्या पार केल्यानंतर आता आपली लाडकी सिध्दी आणि रांगडा शिवादादा यांच्या आयुष्यात सुखाचे क्षण आले आहेत... सिद्धीने घरी ती आई होणार अशी गोड बातमी दिली... सिध्दीने ही गोड बातमीच देताच दोघांच्या नव्या आयुष्याची सुरुवात झाली आहे.

 


असे म्हणायला हरकत नाही... मंगलंने सिद्धिचा नेहेमीच दुस्वास केला पण तरीही सिद्धीने त्यांना माया आणि सन्मान दिला…यासगळ्यात काकी, सोनी, यशवंत यांची साथ सिध्दी – शिवाला कायमच मिळत आहे... सगळे गैरसमज, भांडण सरून आता दोघांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण आले... मालिकेमध्ये बर्‍याच घटना घडत आहेत... पण यातच आनंदाची बातमी नुकताच मालिकेने गाठला ५००  भागांचा गाठला पल्ला आहे. प्रेक्षकांच्या मिळणार्‍या भरघोस प्रतिसादामुळेच हे शक्य झाले… यादीवशी संपूर्ण टीमने सेटवर मज्जा मस्ती केली... दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला, फोटोज काढले, केक कट केला.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Marathi Serial 'Jeev Zhala Yedapisa' reached the milestone of 500 Episodes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.