मराठी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अंकुश चौधरीची तब्बल १५ वर्षांनंतर छोट्या पडद्यावर एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2021 01:30 PM2021-07-31T13:30:54+5:302021-07-31T13:31:23+5:30

'मी होणार सुपरस्टार' या डान्स रिएलिटी शोमध्ये अंकुश चौधरी पहायला मिळणार आहे.

Marathi film superstar Ankush Chaudhary's entry on the small screen after 15 years | मराठी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अंकुश चौधरीची तब्बल १५ वर्षांनंतर छोट्या पडद्यावर एन्ट्री

मराठी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अंकुश चौधरीची तब्बल १५ वर्षांनंतर छोट्या पडद्यावर एन्ट्री

googlenewsNext

मराठी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अंकुश चौधरी तब्बल १५ वर्षांनंतर छोट्या पडद्यावर दमदार एण्ट्री करण्यासाठी सज्ज झाला आहे. स्टार प्रवाहवर २१ ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या ‘मी होणार सुपरस्टार’ या डान्स रिएलिटी शोमध्ये तो सुपर जजच्या भूमिकेत दिसणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील टॅलेण्ट या डान्सच्या मंचावर अवतरणार आहे. नृत्याचे वेगवेगळे प्रकार तितक्याच हटके पद्धतीने मी होणार सुपस्टारच्या मंचावर सादर होणार आहेत. त्यामुळे स्पर्धा अटीतटीची आहे. या स्पर्धकांमधून सुपरस्टार निवडण्याची जबाबदारी अंकुशच्या खांद्यावर आहे.

याबद्दल अंकुश चौधरी म्हणाला, तब्बल १५ वर्षांनंतर पुन्हा एकदा छोट्या पडद्याकडे वळताना खूप आनंद होतो आहे. विशेष म्हणजे मी महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी स्टार प्रवाहसोबत पहिल्यांदाच जोडला जातोय आणि परिक्षकाची भूमिकाही पहिल्यांदाच पार पाडतोय. डान्स हा माझ्या अतिशय आवडीचा विषय आहे. या शोमध्ये जरी मी परीक्षक असलो तरी मी टीव्हीसमोर बसलेल्या प्रेक्षकांच्या प्रतिनिधीची जबाबदारी पार पाडणार आहे. फरक एवढाच असेल की प्रेक्षक या कार्यक्रमाचा आनंद घरबसल्या घेतील आणि मी प्रत्यक्ष घेईन. 


तो पुढे म्हणाला की, मी होणार सुपरस्टार हा कार्यक्रम नवीन ऊर्जा घेऊन येणार आहे. पुन्हा एकदा तीच उर्मी आणि तोच उत्साह या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनुभवायला मिळेल. त्यामुळे मी या शोसाठी प्रचंड उत्सुक आहे. 


मी होणार सुपरस्टार २१ ऑगस्टपासून दर शनिवार आणि रविवार रात्री ९ वाजता फक्त स्टार प्रवाहवर पहायला मिळेल.

Web Title: Marathi film superstar Ankush Chaudhary's entry on the small screen after 15 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.