फिटनेस फ्रिक अभिनेत्री म्हणून मंदिरा बेदी ओळखली जाते. मंदिरा सोशल मीडियावर तिच्या ग्लॅमरस फोटोंना घेऊन चर्चेत असते. ब-याचदा या फोटोंमुळे तिला ट्रोल देखील केले जाते. परंतु त्याची तमा न बाळगता मंदिरा तिचे फोटो शेअर करत असते. मंदिरा सोशल मीडियावर तिच्या वर्कआऊटचे व्हिडिओ शेअर करत असते. बऱ्याचदा मंदिरा सोशल मीडियावर ट्रोल होते. दिलेल्या एका मुलाखतीत मंदिरानं ट्रोलिंगबद्दल सांगितलं होतं की, लोकांचं ट्रोल करणं हरॅसमेंटसारखे वाटते. तरीदेखील ट्रोलर्सकडे लक्ष न देता वर्कआऊटचा व्हिडिओ शेअर करत असते.

आजतकच्या रिपोर्टनुसार मंदिराने दिलेल्या एका मुलाखतीत तिने आपल्या पर्सनल लाईफबाबत अनेक गोष्टींचा खुलासा केला. मंदिराने सांगितले की, करिअरमुळे जवळपास 12 वर्षे ती आई होण्यापासून दूर पळत राहिली. कारण मनोरंजन जगात महिलांचा करिअर जास्त मोठं नसतं. टिव्ही आणि सिनेमांमध्ये जास्त काम करणाऱ्या महिलांबाबत मला असुरक्षिततेची भावना होती.   

मंदिराने 1999 मध्ये निर्माता राज कौशलसोबत लग्न केले. लग्नानंतर 12 वर्षांनी मंदिरा मुलं झालं.  मंदिराने पुढे सांगितले की, माझ्या करारांनी मला प्रेग्नेंट होऊ दिसे नाही. मला भीती होती की जर मी प्रेग्नेंट राहिले तर माझं करिअर संपले. माझ्या पतीमुळे आमचा संसार यशस्वी होऊ शकला. नुकतीच मंदिरा प्रभासच्या साहोमध्ये दिसली होती. यात तिने नेगेटीव्ह शेड् होती. 

Web Title: Mandira bedi reveals what she experienced on delaying pregnancy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.