ठळक मुद्देमानसी आणि हेमंतचा घटस्फोट झाल्यानंतर मानसी एकटी त्यांच्या मुलीला सांभाळत आहे.

मानसी साळवीने कोई अपना सा, पवित्र रिश्ता, सपने सुहाने लडकपन के, प्यार का दर्द है मीठा मीठा यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. तिने मराठीसोबतच हिंदीमध्ये देखील आपली ओळख निर्माण केली आहे. झी मराठीवरील 'काय घडलं त्या रात्री?' या मालिकेत सध्या ती मुख्य भूमिकेत दिसत आहे. या मालिकेच्या निमित्ताने जवळपास १३ वर्षानंतर तिने मराठी टेलिव्हिजनवर एकदा दमदार एन्ट्री केली आहे. मानसीने याआधी सौदामिनी आणि नुपूर या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. तसेच 'असंभव' या मालिकेत मानसीने साकारलेली शुभ्राची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडली होती. 'काय घडलं त्या रात्री?' या मालिकेत ती आय.पी.एस. ऑफिसरच्या भूमिकेत दिसत असून या मालिकेतील तिची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. 

मानसीचे लग्न हेमंत प्रभूसोबत झाले होते. ‘सती.. सत्य की शक्ती’ च्या सेटवर मानसी आणि हेमंतचे प्रेम जुळले. त्यानंतर त्यांनी २००५ साली प्रेमविवाह केला. मानसी आणि हेमंत यांच्या लग्नाला ११ वर्षं झाल्यानंतर त्यांनी घटस्फोटाचा विचार केला. त्यावेळी त्यांची मुलगी अवघी आठ वर्षांची होती. मानसी आणि हेमंत यांनी त्यांचे लग्न टिकवण्याचा बराच प्रयत्न केला. पण काही गोष्टींमुळे अखेर त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. या दोघांनी संगनमताने घटस्फोट घेण्याचे ठरवले होते.

मानसी आणि हेमंतचा घटस्फोट झाल्यानंतर मानसी एकटी त्यांच्या मुलीला सांभाळत आहे. ती कामात कितीही व्यग्र असली तरी तिच्या मुलीला वेळ देते. तिच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटला आपल्याला मुलीसोबतचे अनेक फोटो पाहायला मिळतात. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: manasi salvi is single mother taking care of daughter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.