‘कौन बनेगा करोडपती’मध्ये बायकोनं सांगितली व्यथा, संतापलेल्या नवऱ्यानं पाठवली लीगल नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 02:36 PM2021-09-24T14:36:09+5:302021-09-24T14:37:09+5:30

होय, ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये आपली बदनामी झाल्याचा आरोप करत एका पतीनं सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला चक्क कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

Man slaps defamation-notice after estranged wife appears on Kaun Banega Crorepati 13 | ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये बायकोनं सांगितली व्यथा, संतापलेल्या नवऱ्यानं पाठवली लीगल नोटीस

‘कौन बनेगा करोडपती’मध्ये बायकोनं सांगितली व्यथा, संतापलेल्या नवऱ्यानं पाठवली लीगल नोटीस

Next
ठळक मुद्देविनय खरे यांच्या श्रद्धा खरे पत्नी गत महिन्यात  ‘कौन बनेगा करोडपती 13’ मध्ये सहभागी झाल्या होत्या.

तुमचा आमचा आवडता शो ‘कौन बनेगा करोडपती 13’ (Kaun Banega Crorepati 13 )एका खास कारणाने चर्चेत आहे. होय,शोमध्ये आपली बदनामी झाल्याचा आरोप करत एका पतीनं  सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला चक्क कायदेशीर नोटीस पाठवली आहे.  

काय आहे प्रकरण
विनय खरे यांनी सोनी टीव्हीला ही नोटीस पाठवली आहे. 20 सप्टेंबर रोजी विनय खरे यांनीच या कायदेशीर नोटीसचा फोटो आपल्या ट्विटर अकाउंटवर   पोस्ट करत या प्रकरणाची माहिती दिली. ‘माझ्या पत्नीने या कार्यक्रमात घटस्फोटाचे प्रकरण न्यायालयात असताना माझी बदनामी केली आहे म्हणून मी कायदेशीर नोटीस पाठवली आहे,’ असं विनय खरे यांनी त्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.  विनय खरे यांच्या श्रद्धा खरे पत्नी गत महिन्यात  ‘कौन बनेगा करोडपती 13’ मध्ये सहभागी झाल्या होत्या. यादरम्यान शोचे होस्ट अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्याशी बोलताना, श्रद्धा यांनी आपल्या पतीवर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता. माझ्या पतीनं कधीच माझ्या इच्छा-आकाक्षांना पाठींबा दिला नाही. माझ्या स्वप्नांचा विचार केला नाही. पतीच्या घरगुती हिंसाचारातून स्वत:ची कशी सुटका करून घेतली, हे त्यांनी सांगितलं होतं. पतीपासून मला सुटका हवी होती आणि म्हणून मी घटस्फोटाचा निर्णय घेतला, असं त्या म्हणाल्या होत्या. श्रद्धा यांनी या शोमध्ये केवळ 10 हजारांची रक्कम जिंकली होती.  

Web Title: Man slaps defamation-notice after estranged wife appears on Kaun Banega Crorepati 13

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app