Malaika arora did a marathi style dance on india best dancer stage watch this video | साडीचा पदर खोचून मलायकाचा मराठी स्टाईलमध्ये तूफान डान्स, प्रसिद्ध अभिनेत्रीला दिली टक्कर

साडीचा पदर खोचून मलायकाचा मराठी स्टाईलमध्ये तूफान डान्स, प्रसिद्ध अभिनेत्रीला दिली टक्कर

मलायका अरोरा स्वत: ला फिट ठेवण्यासाठी सर्वकाही करते आणि त्यातील एक भाग म्हणजेच डान्स.  मलायका ही एक उत्कृष्ट डान्सर आहे, हे तिने 'छैयां छैयां'  ते मुन्नी बदनाम या गाण्यांच्या माध्यमातून दाखवून दिले आहे. याच कारणामुळे ती अनेक डान्स रिअ‍ॅलिटी शोमध्ये ती जजची धुरा सांभाळताना दिसली आहे. असाच एक डान्स रिअॅलिटी शो म्हणजे इंडियाज बेस्ट  डान्सर, या शोच्या स्टेजवर मलायकाने असा एक मराठी स्टाईल डान्स केला. जो पाहून सारेच थक्क झाले. 


बाप्पा स्पेशल एपिसोडमध्ये मलायका लाल बनारसी साडी नेसून आली होती.  या कार्यक्रमाची होस्ट भारती सिंगने तिला स्टेजवर आमंत्रित केले आणि मलायका स्टेजवर आली तेव्हा तिने मराठी स्टाईलमध्ये एक दमदार डान्स केले.  त्याचवेळी अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर तिच्या सोबत गेस्ट म्हणून दोन भागांसाठी आल्या होत्या.  दोघींनीही रंगमंचावर जोरदार डान्स केला.  ते पाहून स्पर्धक आणि बाकीचे जजही स्टेजवर आले.


गेल्या तीन वर्षांपासून मलायका आणि अर्जुन एकमेकांना डेट करतायेत.  मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांनी अगदी खुल्लमखुल्ला जगासमोर आपले नाते मान्य केले आणि तेव्हापासून दोघांच्याही प्रेमाला उधाण आले. प्रेम व्यक्त करण्याची एकही संधी मलायका व अर्जुन सोडत नाहीत. लोक काय म्हणतील, याची पर्वा न करता दोघेही एकमेकांवरचे प्रेम व्यक्त करतात.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Malaika arora did a marathi style dance on india best dancer stage watch this video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.