Malaika arora amazing dance on chaiyya chaiyya | 'छैयां छैयां' गाण्यावरील मलायका अरोराचा लेटेस्ट व्हिडीओ होतोय व्हायरल, अभिनेत्री केला धमाकेदार डान्स

'छैयां छैयां' गाण्यावरील मलायका अरोराचा लेटेस्ट व्हिडीओ होतोय व्हायरल, अभिनेत्री केला धमाकेदार डान्स

अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या फिटनेस आणि ग्लॅमरस अदांमुळे बऱ्याचदा चर्चेत येत असते. बऱ्याचदा तिचे स्टायलिश फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. ४७ वर्षीय मलायका अरोरा नेहमी इव्हेंट्स किंवा एअरपोर्टवरील वेगवेगळ्या लूकमधील फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असते. इतकेच नाही तर मलायका आपल्या फिटनेस आणि अर्जुनसोबतच्या रिलेशनशीपमुळेही बऱ्याचदा चर्चेत येत असते. यादरम्यान मलायकाचा एका व्हिडीओ  सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. यात मलायका तिच्या 'छैयां छैयां' गाण्यावर ठुमके लावताना दिसतेय.

मलायकाचा हा डान्स व्हिडीओ इंडियाज बेस्ट डांसर्सच्या मंचावरचा आहे. या रिअॅलिटी शोमध्ये मलायका गेल्या काही वर्षांपासून जज म्हणून दिसतेय. छैयां छैयां गाण्यावरील मलायकाचा हा डान्स व्हिडीओ पाहून चाहते क्रेझी झाले आहेत. 

गेल्या तीन वर्षांपासून मलायका आणि अर्जुन एकमेकांना डेट करतायेत.  मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांनी अगदी खुल्लमखुल्ला जगासमोर आपले नाते मान्य केले आणि तेव्हापासून दोघांच्याही प्रेमाला उधाण आले. प्रेम व्यक्त करण्याची एकही संधी मलायका व अर्जुन सोडत नाहीत. लोक काय म्हणतील, याची पर्वा न करता दोघेही एकमेकांवरचे प्रेम व्यक्त करतात.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Malaika arora amazing dance on chaiyya chaiyya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.