ठळक मुद्देझी मराठी वाहिनीसोबत झालेल्या पहिल्या मीटिंगमध्ये केवळ या मालिकेच्या कथेविषयी मला थोडक्यात सांगण्यात आले होते. यावेळी या मालिकेत मी कोणते पात्रं साकारणार हे देखील मला माहीत नव्हते.

'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेला आज इतकी वर्षं झाली असली तरी या मालिकेची लोकप्रियता थोडीदेखील कमी झालेली नाही. या मालिकेतील राधिका, गुरू, शनाया हे सगळेच प्रेक्षकांचे प्रचंड आवडते आहेत. ही मालिका आजही टिआरपी रेसमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असून या मालिकेला प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळत आहे. या मालिकेचे कथानक प्रेक्षकांना प्रचंड आवडत असून मालिकेत पुढे काय होणार याची उत्सुकता प्रेक्षकांना नेहमीच लागलेली असते. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. या मालिकेबाबत एक खास गोष्ट या मालिकेत राधिकाची भूमिका साकारणाऱ्या अनिता दातेने एका मुलाखतीच्या दरम्यान सांगितली आहे.

अनिता दातेने एका मुलाखतीत तिला राधिकाची भूमिका कशाप्रकारे मिळाली याविषयी सांगितले आहे. ती सांगते, झी मराठीचे निलेश मयेकर यांनी मला एका प्रोजेक्टच्या निमित्ताने भेटायला बोलवले होते. त्यावेळी त्यांनी मला त्यांच्या या नव्या मालिकेबाबत सांगितले. त्या भेटीत केवळ या मालिकेच्या कथेविषयी मला थोडक्यात सांगण्यात आले होते. यावेळी या मालिकेत मी कोणते पात्रं साकारणार हे देखील मला माहीत नव्हते. या मालिकेच्या चित्रीकरणाच्या काही दिवस आधी मी राधिका सुभेदार ही भूमिका साकारणार आणि तिचा पती शनाया या मुलीच्या प्रेमात आहे असे मालिकेत दाखवले जाणार असल्याचे मला सांगण्यात आले. पण तरीही या मालिकेत शनायाच्या भूमिकेत कोण असणार हे देखील मला माहीत नव्हतं.

अभिजीत खांडकेकर, इशा केसकर आणि अनिता दाते यांची मुख्य भूमिका असलेली माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका गेल्या कित्येक महिन्यांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या आहेत. टिआपरीच्या रेसमध्ये पूर्वी माझ्या नवऱ्याची बायको हीच मालिका अव्वल स्थानावर होती. पण तुझ्यात जीव रंगला या मालिकेने आता या मालिकेला चांगलेच मागे टाकले आहे. गेल्या अनेक आठवड्यांपासून ही मालिका दुसऱ्या क्रमांकावर आहे. 

Web Title: majhya navryachi bayko radhika aka anita date tells about this serial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.