टीव्ही दुनियेतील मोस्ट लविंग कपल जय भानुशाली आणि माही विजच्या घरी 21 ऑगस्टला चिमुकल्या परीचे आगमन झाले आहे. ''ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार...'' आम्ही देवाकडे इतकी वर्षं केलेली प्रार्थना देवाने पूर्ण केली. मला आई बनवण्यासाठी धन्यवाद. आमच्या आयुष्यात गोंडस मुलगी आली असून आमचे आयुष्य संपूर्णपणे बदलण्यासाठी खूप सारे धन्यवाद...अशी पोस्ट माहीने सोशल मीडियावर शेअर केली होती. सध्या त्यांच्या घरी आनंदाचं वातावरण आहे. 

घरात चिमुकलीच्या आगमनाने दोघांच्याही आनंदाला पारावर राहिलेला नाही. सध्या हे दोघे आपल्या मुलीचे नाव काय ठेवावे त्याच्या विचारात आहे.  'T' आणि 'M' या अक्षरावरून त्यांना मुलीचे नाव ठेवायचे आहे. त्यामुळे या कपलने एक शक्कल लढवली आहे. सोशल मीडियावरच आपल्या चाहत्यांकडून याविषयी सुचना मागवल्या आहेत. सुचवलेले जे नाव या दोघांना आवडतील त्यानुसार ते आपल्या मुलीचे नाव ठेवणार आहेत.  

सध्या माही आणि जयचे फॅन्सना त्यांना त्यांच्या पोस्टवर कमेंट करत खूप साऱ्या शुभेच्छा देत आहेत. जय आणि माही यांचे लग्न २०११ मध्ये झाले होते. माही आणि जय यांचे हे पहिले मूल असले तरी त्यांनी दोन मुले दत्तक घेतली आहेत. ही दोन्ही मुले जय आणि माहीकडे काम करणाऱ्या बाईची असून ती त्यांच्या पालकांसोबतच राहातात. केवळ हे दोघे या मुलांचा संपूर्ण खर्च उचलतात. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Mahhi Vij Ask Fans To Suggest Name For Her Newlyborn Daughter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.