सर्वत्रच जन्माष्टमीची तयारी जोरात सुरू झालीय...आणि अशातच धकधक गर्ल माधुरी यंदाची जन्माष्टमीला काही तरी वेगळं करण्याचीसाठी सज्ज झालीय., डान्स दीवानेच्या सेटवर माधुरीने स्पर्धकांस जन्माष्टमी साजरी केली.स्पर्धक विहान त्रिवेदी आणि त्विशा पटेल  या बाल स्पर्धकांनी जन्माष्टमीवर एक विशेष परफॉर्मन्स सादर केला. या खास परफॉर्मन्ससाठी विहानने कृष्णदेवाचा तर त्विशाने राधाचा वेश परिधान केला होता.

'किसना है' या गाण्यावर त्या दोघांनी अतिशय नटखट नाट्य सादर केले आणि परीक्षकांनी त्यांची खूप  कौतुकही केले. या परफॉर्मन्स नंतर, माधुरीने यशोदा मैय्या प्रमाणे विहानला माखन भरवण्याची  इच्छा व्यक्त केली. एवढेच नाही तर हा सण उत्साहाने साजरा करण्यासाठी सेटवरच स्पर्धकांनी मानवी पिरॅमिड उभा केला आणि दही हंडी फोडली. या उत्साही वातावरणाने प्रसन्न झालेला शशांक खेतान आणि तुषार कालिया हे सुध्दा गोकुळाष्टमीच्या प्रसिध्द गाण्यांवर डान्स करण्यासाठी स्पर्धकांसह मंचावर सामील झाले. स्पर्धक आणि परीक्षक जन्माष्टमीच्या पवित्र समारंभ साजरा करत असल्यामुळे हा एपिसोड अधिक रंजक असणार यांत काही शंका नाही. 

विशेष म्हणजे माधुरी इतक्यावरच थांबली नाही त्यावेळी तिने  जन्माष्टमीच्या मुहुर्तावर  स्पर्धक अनिशच्या आईचे डोहाळेजवेण पुरवण्याची घोषणा केली. कुटुंबियांपासून लांब रहात असल्यामुळे अनिशच्या आईचे डोहाळजेवण झालेले नाही. माधुरी दीक्षितला हे कळताच  तिने तिच्यासाठी डोहाळजेवण आयोजित करून तिला एक छान सरप्राईज दिले.

पारंपारिक पध्दतीने डोहाळजेवण हा महिलांचा समारंभ आहे आणि त्यामुळे स्पर्धक आणि त्यांचे कुटुंबिय अनिशच्या आईच्या कौतुकात माधुरीच्या विचारपूर्वक कृतीत सामील झाले. या प्रत्येकाने केलेल्या कौतुकाने अनिशची आई निःशब्द झाली आणि भारावून गेली. 


Web Title: Madhuri Dixit celebrates Janmashtami on the set of Dance Deewane
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.