Lucky it happened that Shivani Bawkar, who played the role of Sheetal in this series, got so much money for the series. | ​लागीरं झालं जी या मालिकेत शीतलची भूमिका साकारणाऱ्या शिवानी बावकरला या मालिकेसाठी मिळते इतके मानधन

​लागीरं झालं जी या मालिकेत शीतलची भूमिका साकारणाऱ्या शिवानी बावकरला या मालिकेसाठी मिळते इतके मानधन

छोट्या पडद्यावर विविध मालिका रसिकांचे मनोरंजन करतायत. विविध मालिकांमधील नायक-नायिकांच्या जोड्या रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहेत. मग ती राणा- अंजली असो किंवा गुरुनाथ-राधिका. प्रत्येक जोडी घराघरात पोहचली. या प्रत्येक जोडीला रसिकांनी अक्षरक्ष: डोक्यावर घेतले आहे. लागीरं झालं जी ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येऊन काहीच महिने झाले असले तरी ही मालिका प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहेत. टीव्ही मालिकांमधील इतर जोड्यांप्रमाणेच या मालिकेतील शीतल आणि अजिंक्यची जोडीसुद्धा रसिकांच्या मनात स्थान मिळवू लागली आहे. या मालिकेत प्रेक्षकांना अज्या आणि शीतलीची प्रेमकथा पाहायला मिळत आहे. मालिकेत आता अज्या आणि शीतलीची प्रेमकथा फुलू लागलीय. या मालिकेत शीतलची भूमिका अभिनेत्री शिवानी बावकर ही साकारते आहे. शिवानी मुळची पुण्याची असून ती केवळ २५ वर्षांची आहे. तिला लहानपणापासून अभिनयाची आवड असल्याने ती अभिनयक्षेत्रात आपले नाव कमवण्यासाठी गेल्या कित्येक दिवसांपासून मुंबईत राहात आहे. 
शिवानी सध्या लागीरं झालं जी या मालिकेत काम करत असली तरी तिने याआधी अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. अगले जन्म मोहे बिटिया ही किजो, फुलवा यांसारख्या हिंदी मालिकांमध्ये शिवानी झळकली होती. तसेच तिने देवयानी, सुंदर माझं घर यांसारख्या मराठी मालिकांमध्ये देखील छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. तिने मालिकांप्रमाणे चित्रपटामध्ये देखील काम केले आहे. उंडगा हा तिचा चित्रपट काहीच दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला होता.
शिवानी ही केवळ २५ वर्षांची असली तरी तिची कमाई ही खूपच जास्त आहे. शिवानी एका दिवसात किती रुपये कमवते हे ऐकले तर तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल. लागीरं झालं जी या मालिकेच्या चित्रीकरणासाठी केवळ एका दिवसाचे ती २०-२५ हजार रुपये घेत असल्याची जोरदार चर्चा आहे. हा आकडा कोणीही अधिकृत रित्या सांगितलेला नाहीये तर हा इंटरनेटवर उपलब्ध आहे. त्यामुळे शिवानी दिवसांची कमाई खरंच इतकी आहे का हे केवळ तीच आपल्याला सांगू शकते. 


Also Read : ​लागिरं झालं जी मधील अज्या म्हणजेच नितीश चव्हाणचा खऱ्या आयुष्यातील फोटो पाहून तुम्हाला बसेल आश्चर्याचा धक्का

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Lucky it happened that Shivani Bawkar, who played the role of Sheetal in this series, got so much money for the series.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.