'आई कुठे काय करते' मालिकेतल्या अरुंधतीच्या खऱ्या आयुष्यातील लाईफ पार्टनरबद्दल या गोष्टी माहिती आहे का ?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2021 07:13 PM2021-07-24T19:13:51+5:302021-07-24T19:14:08+5:30

अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुळकरने या मालिकेपूर्वी 'इंद्रधनुष्य','असंभव' या मालिकेतही काम केले आहे. तर 'सुंदर माझं घर', 'गोड गुपित', 'समांतर, 'नवरा माझा नवसाचा', 'मणी मंगळसूत्र' यांसारख्या मराठी सिनेमातही आपल्या अदाकारीने रसिकांची मनं जिंकली आहे.

Lesser known fact about Aai Kuthe Kay Karte Actress Arundhati's Real Life husband, Check Here | 'आई कुठे काय करते' मालिकेतल्या अरुंधतीच्या खऱ्या आयुष्यातील लाईफ पार्टनरबद्दल या गोष्टी माहिती आहे का ?

'आई कुठे काय करते' मालिकेतल्या अरुंधतीच्या खऱ्या आयुष्यातील लाईफ पार्टनरबद्दल या गोष्टी माहिती आहे का ?

Next

'आई कुठे काय करते' मालिका दिवसेंदिवस रंजक वळणामुळे रसिकांचीही आवडती मालिका बनली आहे. मालिकेतील कथानक आणि दमदार अभिनय यामुळे रसिकही मालिकेला खिळून आहेत. सुरुवातीपासूनच मालिकेला प्रचंड पसंती मिळत आहे. मालिकेत अरुंधती साकारणारी अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुळकरही लोकप्रिय झाली आहे. 

तिच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यात तिच्या चाहत्यांना प्रचंड रस असतो. त्यामुळे रिल लाईफ प्रमाणे रिअल लाईफमधल्या गोष्टीही जाणून घेण्यात रसिक नेहमीच उत्सुक असतात. मधुराणी यांचं लग्न दिग्दर्शक प्रमोद प्रभुलकर यांच्याशी ९ डिसेंबर २००३ झालं.या कपलला एक मुलगीही आहे.

'ना. मुख्यमंत्री गणप्या गावडे', 'युथट्युब' या मराठी सिनेमाचेही प्रमोद प्रभुलकर यांनी दिग्दर्शन केले आहे. प्रमोद प्रभुळकर अभिनय कार्यशाळाही चालवतात. अभिनेत्री शिवानी बावकर,पौर्णिमा डे सारखे कलाकारांनीही त्यांच्याच मार्गदर्शनाखाली अभिनयाचे धडे गिरवले आहेत. या कलाकारांनी आज इंडस्ट्रीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. 

मधुराणी आणि प्रमोद प्रभुळकर या दोघांचेही फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळतात. दोघेही बिझी शेड्युअलमधून आवर्जुन वेळ काढत कुटुंबासह एन्जॉय करताना दिसतात.त्यांच्या या फोटोंनाही चाहत्यांचे भरभरुन लाईक्स मिळत असतात.


अभिनेत्री मधुराणी यांनी या मालिकेपूर्वी 'इंद्रधनुष्य','असंभव' या मालिकेतही काम केले आहे. तर  'सुंदर माझं घर', 'गोड गुपित', 'समांतर, 'नवरा माझा नवसाचा', 'मणी मंगळसूत्र' यांसारख्या मराठी सिनेमातही आपल्या अदाकारीने रसिकांची मनं जिंकली आहे. मधुराणी यांनी 'आई कुठे काय करते' या मालिकेतून जवळपास १० वर्षांनंतर टीव्हीवर कमबॅक केले आहे.  

इतका मोठा ब्रेक घेण्याचे कारणही तसे खास आहे. मधुराणीला आता सहा वर्षांची मुलगी आहे. तिच्या जन्मानंतर तिला वेळ देता यावा म्हणून हा ब्रेक घेतला होता.'आई कुठे काय करते' मालिकेचा विषय आणि त्याची मांडणी मला खूप आवडली आणि मालिका करण्याचा मी निर्णय घेतल्याचे मधुराणीने मुलाखतीत सांगितले होते.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Lesser known fact about Aai Kuthe Kay Karte Actress Arundhati's Real Life husband, Check Here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app