'Lagir Jhala Ji' fame Kiran Gaikwad and actress Monalisa Bagal getting married? | 'लागीर झालं जी' फेम किरण गायकवाड आणि अभिनेत्री मोनालिसा बागल अडकले लग्नबेडीत?, जाणून घ्या काय आहे ही भानगड

'लागीर झालं जी' फेम किरण गायकवाड आणि अभिनेत्री मोनालिसा बागल अडकले लग्नबेडीत?, जाणून घ्या काय आहे ही भानगड


लागीर झालं जी मालिकेतील भैय्यासाहेबाच्या भूमिकेतून घराघरात पोहचलेला अभिनेता किरण गायकवाड आणि अभिनेत्री मोनालिसा बागल लग्नबेडीत अडकल्याची सध्या सगळीकडे चर्चा होताना दिसते आहे. इतकेच नाही तर त्या दोघांचा मुंडावळा बांधलेल्या आणि मोनालिसाच्या गळ्यात मंगळसूत्र असलेला फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे. त्यांच्या फोटोवर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे.


अभिनेता किरण गायकवाड याने इंस्टाग्रामवर मोनालिसासोबतचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत लिहिले की, टोटल हुबलाक.


किरणने त्याच्या व्हायरल होणाऱ्या लग्नाच्या फोटोमागचे सत्य स्वतःच फोटोसोबत दिलेल्या कॅप्शनमधून सांगितलं आहे. खरंतर किरण गायकवाडची झी मराठी वाहिनीवर नवीन मालिका दाखल होत आहे आणि या मालिकेत त्याच्यासोबत मोनालिसा दिसणार आहे.
किरण गायकवाडने हुबलाकचा टीझर इंस्टाग्रामवर शेअर करत लिहिले की, या लॉकडाउनमुळे लाईफची वाट लागलीया... जिंदगी क्वारंटाईन झालीया... पण आता हितुन पुढचा समदा येळ तुमच्यासंग टोटल हुबलाक असणारंय.. कारण *"वाघोबा प्रॉडक्शन्स"* घेऊन येत हाय.. नवी खट्ट मालिका "टोटल हुबलाक" फक्त आपल्या आवडत्या *झी मराठी* वाहिनीवर... लवकरच..!!!


किरण गायकवाड या दोन्ही पोस्टवरून स्पष्ट होते की ते दोघे मालिकेत लग्नबेडीत अडकताना दिसणार आहेत.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: 'Lagir Jhala Ji' fame Kiran Gaikwad and actress Monalisa Bagal getting married?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.