‘लागिरं झालं जी’ फेम शीतली अर्थात शिवानी बावकरला कोरोनाची लागण, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2021 05:05 PM2021-04-19T17:05:45+5:302021-04-19T17:07:53+5:30

ट्वीट करत शिवानीने करोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे.

lagir jhal ji fame shivani baokar tested corona positive | ‘लागिरं झालं जी’ फेम शीतली अर्थात शिवानी बावकरला कोरोनाची लागण, म्हणाली...

‘लागिरं झालं जी’ फेम शीतली अर्थात शिवानी बावकरला कोरोनाची लागण, म्हणाली...

googlenewsNext
ठळक मुद्देअभिनय क्षेत्रात येण्याआधी शिवानीने जर्मन ट्रान्सलेटर म्हणूनही एका आयटी कंपनीत काम केले आहे.

कोरोनाचा कहर वाढत आहे. महाराष्ट्रात तर कोरोनाने हाहाकार माजला आहे. सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटी कोणीही या व्हायरसपासून सुरक्षित नाही. गेल्या काही दिवसांत अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाली. आता ‘लागिरं झालं जी’ या मालिकेतील शीतलीला अर्थात शीतलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री शिवानी बावकरला (Shivani Baokar) कोरोना झाला आहे.
शिवानीने स्वत: सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. (lagir jhal ji fame Shivani Baokar tested corona positive)

‘नमस्कार मित्रांनो! सर्व काळजी घेऊनही, दुर्दैवाने माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी घरातच आयसोलेशनमध्ये आहे. सर्व आवश्यक प्रोटोकॉलवे पालन करत, मी माझ्या डॉक्टरांनी सांगितल्यानुसार औषधोपचार करीत आहे. मी सर्वांना विनंती करते की कृपया अतिरिक्त खबरदारी घ्या आणि आवश्यक असल्यासच घराच्या बाहेर पडा. सुरक्षित रहा आणि निरोगी रहा. भेटू लवकरचं...,’ असे असे ट्वीट शिवानीने केले आहे.

लागिरं झालं जी’ या मालिकेमुळे शिवानी घराघरात पोहोचली. या मालिकेतील तिची भूमिका चांगलीच लोकप्रिय झाली होती. इतकी की, मालिका संपली पण आजही प्रेक्षक  शिवानीला शितली नावानेच ओळखतात.

अभिनय क्षेत्रात येण्याआधी शिवानीने जर्मन ट्रान्सलेटर म्हणूनही एका आयटी कंपनीत काम केले आहे. कॉलेजमध्ये असताना जर्मन भाषा आॅप्शनल म्हणून निवडली होती. ती शिकत असताना शिवानीने ती चटकन आत्मसात केली. शिकताना जर्मन भाषेबाबत आवड निर्माण झाली. त्यामुळे जर्मन भाषा शिकण्याच्या विविध लेव्हल्स तिने पार केल्या. त्यामुळेच मराठी, हिंदी, इंग्रजीप्रमाणेच शिवानी जर्मन भाषाही तितक्याच फाडफाड आणि बिनधास्तपणे बोलू शकते.

Web Title: lagir jhal ji fame shivani baokar tested corona positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.