Laddu's father is the famous Lifting champion in this series of things ... Learn about Laddu's personal life ... | ​तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील लाडूचे वडील आहेत प्रसिद्ध लिफ्टिंग चॅम्पियन... जाणून घ्या लाडूच्या वैयक्तिक आयुष्याविषयी...
​तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील लाडूचे वडील आहेत प्रसिद्ध लिफ्टिंग चॅम्पियन... जाणून घ्या लाडूच्या वैयक्तिक आयुष्याविषयी...
तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील राजवीर म्हणजे लाडू याचं खरं राजवीरसिंह रणजीत गायकवाड आहे. राजवीरसिंहचा जन्म २२ ऑक्टोबर २०१३ साली सांगली येथे झाला असून आता तो आता ४ वर्षांचा आहे. राजवीरसिंहचे वडील रणजीत गायकवाड हे प्रसिद्ध लिफ्टिंग चॅम्पियन आहेत. वेट लिफ्टिंग मध्ये त्यांनी सलग ५२ राज्यस्तरीय आणि १० राष्ट्रीय तसेच अनेक इंटरनॅशनल स्पर्धा खेळल्या आहेत. त्यात त्यांना अनेकदा गोल्ड मेडल देखील मिळाले आहे. त्यानंतर भारतीय सेनेत त्यांनी मानाची नोकरी पत्करली तर आई पल्लवी रणजित गायकवाड या एम. कॉम आणि एम. बी. ए. इन फायनान्स मधून पदवीधर आहेत. काही काळ त्या सांगली जिल्हामध्यवर्ती बँकेत अकाऊंटण्ट ही होत्या. पण सध्या राजीवरच्या उज्वल भविष्यासाठी कोल्हापूर येथे स्थायिक झाल्या आहेत. ‘लाडू’ चे आजोबा विठ्ठल कृष्णा गायकवाड हे देखील प्रसिद्ध कुस्ती पैलवान होते. विठ्ठल गायकवाड वस्ताद हे सांगली जिल्ह्यातील कसबे डीग्रज गावात टेलिफोन खात्याचे कर्मचारी होते. टेलिफोन कुस्ती स्पर्धेत विठ्ठल गायकवाड यांचं नाव नेहमीच अग्रस्थानी असायचे. साधारण ४ वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले. आपल्या मुलाने आपल्यासारखेच कुस्तीत नाव कमवाव असे त्यांना नेहमी वाटायचे. त्यांची हीच इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांचा नातू म्हणजेच आपला लाडका लाडू कोल्हापुरात दाखल झाला. 
लाडू हा सध्या मोतीबाग तालीम येथून कुस्तीचे धडे घेत आहे तर कोल्हापुरातील ‘लिट्ल वंडर स्कूल’ मध्ये तो शिकत आहे. शाळेतही तो तितकाच हुशार आहे. त्याला फुटबॉल, चेस, बैडमिंटन खेळाची आवड आहे. “लाठी-काठी” ह्या शिवकालीन खेळाचाही तो सध्या सराव करतोय. काही दिवसांपूर्वी लाठी-काठी चा सराव करताना डेन्मार्क येथून काही मंडळी डॉक्युमेंटरी करण्यासाठी आले होते आणि ते आपल्या लाडूचे काही फोटो आणि क्लिप्स घेऊन गेले. लवकरच ही लाठी-काठीची डॉक्युमेंटरी प्रसिद्ध होणार आहे. 

Also Read : ​सुयश टिळकने तुझ्यात जीव रंगला फेम अक्षया देवधरला दिल्या अशा वाढदिवसाच्या शुभेच्छाWeb Title: Laddu's father is the famous Lifting champion in this series of things ... Learn about Laddu's personal life ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.