'बाळूमामाच्या नावानं चांगभलं'मध्ये कुणकेश्वराच्या शिवमंदिराची प्राचीन कथा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2018 03:54 PM2018-12-05T15:54:50+5:302018-12-05T15:55:18+5:30

कलर्स मराठीवरील बाळूमामाच्या नावानं चांगभलं मालिकेमध्ये बऱ्याच घटना, चमत्कार प्रेक्षकांना बघायला मिळत आहेत.

Kunkeshwar Shiv Temple story in Balumamachya Navane Changbhala | 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं'मध्ये कुणकेश्वराच्या शिवमंदिराची प्राचीन कथा

'बाळूमामाच्या नावानं चांगभलं'मध्ये कुणकेश्वराच्या शिवमंदिराची प्राचीन कथा

googlenewsNext

 कलर्स मराठीवरील 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं' मालिकेमध्ये बऱ्याच घटना, चमत्कार प्रेक्षकांना बघायला मिळत आहेत. येत्या आठवड्यामध्ये मालिकेमध्ये बऱ्याच घटना घडणार आहेत. आगामी भागात कुणकेश्वर येथील आख्यायिका पहायला मिळणार आहे.


बाळूने चंदुलालवर नाराज होऊन त्याचे घर सोडून दिले आहे. कारण, बाळूला देण्यात आलेले ताट चंदुलालची आई बाळूला देण्यास नकार देते आणि त्यामुळेच बाळू तीन दवस उपाशी राहतो. बाळू आता चंदुलालच्या घरी नसल्याने, आता सगळेच हैराण झाले आहेत. बाळू कुठेच सापडत नाही. बाळूने चंदुलालचे घर सोडल्यानंतर वाटेमध्ये त्याला एक साधू भेटतात आणि त्यांच्याबरोबरच बाळू देवगड येथील प्रसिद्ध देवस्थान कुणकेश्वरच्या शिव मंदिराच्या दिशेने निघतो. या आठवड्यामध्ये प्रेक्षकांना कुणकेश्वर येथील आख्यायिका पहायला मिळणार आहे.
देवगड येथील कुणकेश्वर या शिव मंदिरात बाळू एक प्रतिज्ञा देखील घेणार आहे. ही प्रतिज्ञा काय असेल ? हे प्रेक्षकांना लवकरच कळेल. तसेच असे देखील म्हटले जाते की ज्या साधू महाराजाच्या मदतीने बाळू तिथवर पोहचला त्यांना तो वचन देतो की दरवर्षी या मंदिरात मी एकदा आंघोळ करायला येईन तेव्हा तुम्हाला नक्की भेटेन. कुणकेश्वराच्या शिवमंदिराची प्राचीन कथा जाणून घेण्यासाठी ही मालिका नक्की पाहा.
संत बाळूमामा आणि त्यांची आई सुंदरा या दोघांमधील खूप सुंदर आणि अतूट नाते मालिकेमध्ये अत्यंत छानप्रकारे दाखविण्यात येत आहे. त्यांच्या आईंचा त्यांच्यावर असलेला विश्वास, प्रेम तसेच त्यांची आईवर असलेली निष्ठा अतिशय अप्रतिमरीत्या प्रेक्षकांसमोर मांडण्यात येत आहे. 

Web Title: Kunkeshwar Shiv Temple story in Balumamachya Navane Changbhala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.