'कुंडली भाग्य' मालिकेतील अभिनेत्री रूही चतुर्वेदीने बॉयफ्रेंड शिवेंद्र सानियोलसह लग्नबंधनात अडकत आपल्या आयुष्याची नवी सुरूवात केली आहे. जयपुरमध्ये हे शाही लग्न पार पडले.  मोठ्या थाटामाटात झालेल्या या लग्नाचे सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत.  
या शाही लग्नाचे सगळ्या फोटोंवर शुभेच्छांचा वर्षाव होत असताना आणखीन एका फोटोने सा-यांचे लक्ष वेधले आहे.

 

या फोटोत नववधू रूही दारूच्या नशेत झिंगत असल्याचे पाहायला मिळते आहे. तर पती शिवेंद्र पत्नी रूहीला सांभाळताना पाहायला मिळतोय. या फोटोत बेडवर ती दारूच्या नशेत फुल ऑन बुडाल्याचे पाहायला मिळते. तर तिच्या बाजुला दारूची बॉटलही दिसत आहे. या फोटोंमुळे नेटीझन्स तिच्यावर संमिश्र प्रतिक्रीया देत असल्याचे पाहायला मिळते आहे.

या लग्नात कुटुंबियांसह 'कुंडली भाग्य' मालिकेतील कलाकार मंडळींनीही हजेरी लावली होती. या सगळ्यांनी मिळून या लग्नात एकच धमाल उडवली. रूही आणि शिवेंद्र एकमेकांना गेल्या 13 वर्षापासून ओळखत आहेत. दोघांच्या आवडी - निवडी सारख्याच असल्यामुळे कुटुंबियांच्या सहमतीने दोघांनी लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला.

Web Title: Kundli Bhagya Actress Ruhi Chaturvedi First did Marriage & had drunk in reception. Did such nuisanceperforms earlier marriage, reception after drunk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.