ठळक मुद्देगोविंदाची पत्नी सुनीतामुळेच कृष्णाने द कपिल शर्मा शोमध्ये गोविंदाच्या कुटुंबियांसोबत चित्रीकरण केले नाही असे स्वतः कृष्णानेच मीडियाशी बोलताना सांगितले आहे.

द कपिल शर्मा शो साठी नुकतेच गोविंदा, त्याची पत्नी सुनिता आणि मुलीसोबत चित्रीकरण केले. या कार्यक्रमात गोविंदाचा भाचा कृष्णा अभिषेक एका महत्त्वाच्या भूमिकेत आहे. पण गोविंदाच्या कुटुंबियांसोबत कृष्णाने चित्रीकरण केले नसल्यामुळे आता सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. कृष्णाचे गोविंदाच्या कुटुंबियांसोबतचे संबंध चांगले नाहीयेत अशा बातम्या गेल्या काही दिवसांपासून मीडियात येत होत्या. आता गोविंदाची पत्नी सुनीतामुळेच कृष्णाने द कपिल शर्मा शोमध्ये गोविंदाच्या कुटुंबियांसोबत चित्रीकरण केले नाही असे स्वतः कृष्णानेच मीडियाशी बोलताना सांगितले आहे.

कृष्णाने बॉम्बे टाईम्सशी बोलताना सांगितले की, चीची मामा आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत माझे चित्रीकरण नसावे असे सुनीता यांची इच्छा होती. त्यामुळे ते येण्यापूर्वीच माझे चित्रीकरण करण्यात आले. खरे तर हे कळल्यावर मला आश्चर्याचा धक्का बसला होता. तसेच मला खूप वाईट देखील वाटले होते. कारण या कार्यक्रमातील माझी सपना ही भूमिका ही कार्यक्रमाचा महत्त्वाचा भाग असल्याने मी दर भागात सेलिब्रेटी आल्यानंतर देखील येतो. पण माझे चित्रीकरण त्यांच्या अनुपस्थितीत आटोपण्यात आले. नर्मता तिच्या अल्बमचे प्रमोशन करण्यासाठी या कार्यक्रमात आली होती. तिच्यासाठी हा मोठा दिवस असल्याने मला तिचा दिवस खराब करायचा नव्हता. त्यामुळे मी कोणताही गोंधळ घातला नाही. मी माझ्या लहान बहिणीसाठी येवढे करू शकतो तर मी माझ्या मोठ्यांकडून देखील ही अपेक्षा नक्कीच ठेवू शकतो. आम्ही आमच्यात असलेल्या वादाविषयी सार्वजनिकरित्या बोलू नये असे चीची मामाचे नेहमीच म्हणणे असते. पण यासारख्या गोष्टी घडत असतील तर ते वाईट आहे.

कृष्णाची पत्नी कश्मिरा शाहने काही महिन्यांपूर्वी एक ट्वीट केले होते त्यात लोक पैशांसाठी नाचतात असा उल्लेख करण्यात आला होता. हे ट्वीट गोविंदासाठी केले असा गोविंदाच्या कुटुंबियांचा समज झाल्याने त्यांनी कृष्णाच्या कुटुंबियांशी न बोलणेच पसंत केले होते. पण हे ट्वीट केवळ मजा म्हणून कृष्णाची बहीण आरती सिंगसाठी कश्मिराने टाकले होते असे कृष्णाने स्पष्टीकरण दिले होते.

या वादाविषयी गोविंदा सांगतो, चीची मामा आणि माझ्यात सहा महिन्यांपूर्वीच पॅच अप झाले होते. मी त्यानंतरही त्यांना भेटायला अनेकवेळा घरी गेलो आहे. मी त्यांना 20 दिवसांपूर्वीच दुबईला भेटलो होतो. मामीसोबतदेखील मी संबंध चांगले करण्याचा प्रयत्न करत आहे. पण ती अद्याप माझ्यावर चिडलेली आहे. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Krushna Abhishek not allowed to share stage with Govinda on The Kapil Sharma Show: ‘Sad this has happened’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.