जाणून घ्या उर्वशी ढोलकियाच्या या खास गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2017 11:25 AM2017-07-26T11:25:37+5:302017-07-26T16:55:37+5:30

छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहे.एकता कपूरच्या चंद्रकांता या मालिकेतून अभिनेत्री उर्वशी ढोलकिया ब-याच काळानंतर छोट्या पडद्यावर परतली आहे. या ...

Know these special things of Urvashi drummer | जाणून घ्या उर्वशी ढोलकियाच्या या खास गोष्टी

जाणून घ्या उर्वशी ढोलकियाच्या या खास गोष्टी

googlenewsNext
ट्या पडद्यावर कमबॅक करत आहे.एकता कपूरच्या चंद्रकांता या मालिकेतून अभिनेत्री उर्वशी ढोलकिया ब-याच काळानंतर छोट्या पडद्यावर परतली आहे. या मालिकेतून उर्वशी व्हिलनच्या रुपात रसिकांच्या भेटीला आली आहे. 17 वर्षांपूवी कसोटी जिंदगी की मालिकेतून उर्वशी घराघरात पोहचली. तिनं साकारलेली कोमोलिका घराघरात लोकप्रिय ठरली. कोमोलिकाचा अंदाज रसिकांना चांगलाच भावला. कोमोलिका अशी काही प्रसिद्ध झाली की महिलांमध्ये तर कोमोलिकाप्रमाणे नटण्याचा नवा फॅशन ट्रेंडच सुरु झाला.या मालिकेनंतर तिने 'घर एक मंदिर', 'कभी सौतन कभी सहेली' अशा मालिकांमध्ये काम केलं.'बिग बॉस' या रियालिटी शोमध्येही ती झळकली.मात्र 'चंद्रकांता' या मालिकेतून ख-या अर्थाने तिचे कमबॅक झाले.या मालिकेतील भूमिकेमुळे ती सध्या बरीच एक्साईटेड आहे.'चंद्रकांता' या मालिकेत उर्वशीसोबत मधुरिमा तुली आणि विशाल आदित्य सिंग प्रमुख भूमिकेत आहेत.उर्वशीला जी लोकप्रियता मिळत आहे त्यासाठी बराच स्ट्रगलही करावा लागला. तिच्या आयुष्यात अनेक चढउतारही आहे. वयाच्या सहाव्या वर्षापासून तिने अभिनयाला सुरुवात केली. लक्स साबणाच्या जाहिरातीमुळे तिला छोट्या पडद्यावर काम करण्याची संधी मिळाली.वयाच्या आठव्या वर्षी 'वक्त की रफ्तार' या मालिकेत काम करण्याची संधी तिला मिळाली.विविध मालिका आणि सिनेमांमध्ये तिने बालकलाकार म्हणून भूमिका साकारल्या आहेत.'देख भाई देख' आणि 'शक्तीमान' अशा मालिकांमध्येही उर्वशीच्या अभिनयाची जादू पाहायला मिळाली. मात्र तिला खरी ओळख मिळवून दिली ती 'कसोटी जिंदगी'च्या कोमोलिकानेच.वयाच्या 17व्या वर्षीच ती दोन मुलांची आई बनली. 37 वर्षीय उर्वशीने आई आणि वडिल अशा दोन भूमिका मोठ्या निभावत क्षितीज तसंच सागर या आपल्या मुलांचं पालनपोषण केलं आहे. 

Web Title: Know these special things of Urvashi drummer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.