Know how Tarak Mehta's reverse glasses are available for every single day in the series. | ​जाणून घ्या तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील प्रत्येक कलाकाराला एका दिवसासाठी मिळतात तब्बल इतके पैसे

​जाणून घ्या तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील प्रत्येक कलाकाराला एका दिवसासाठी मिळतात तब्बल इतके पैसे

तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका गेल्या काही वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. या मालिकेतील सगळ्याच कलाकारांना या मालिकेमुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. या मालिकेतील बहुतांश कलाकारांची ही पहिलीच मालिका होती. पण त्यांच्या पहिल्याच मालिकेने त्यांना खूप फेमस बनवले. आज जेठालाल, दया, आत्माराम भिडे, माधवी भिडे, तारक मेहता, अंजली, अय्यर, बबिता, टप्पू, पोपटलाल या सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या आहेत. ही मालिका गेली नऊ वर्षं सुरू असून ही मालिका टिआरपीच्या रेसमध्ये देखील अव्वल आहे. 
तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील सगळेच कलाकार सध्या चांगलंच कमावत आहेत. या लोकांची केवळ एक दिवसाची कमाई किती आहे हे ऐकल्यावर तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल. वेबमसाला या वेबसाईटने तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील कलाकारांना चित्रीकरणासाठी एका दिवसाचे किती पैसे मिळतात याबाबत लिहिले आहे. या बेवसाईटनुसार तारक मधील प्रत्येक कलाकाराला प्रत्येक दिवसासाठी इतके पैसे मिळतात.

दिलीप जोशी (जेठालाल) ५० हजार
दिशा वकानी (दया) ४० हजार
अमित भट्ट (बाबूजी) ३५ हजार
शैलेश लोढा (तारक) ३२ हजार
नेहा मेहता (अंजली) २५ हजार
तनुज महाशब्दे (अय्यर) २३ हजार
मुनमुन दत्ता (बबिता) ३० हजार
मंदार चांदवलकर (आत्माराम भिडे) ३० हजार
सोनालिका जोशी (माधवी) २५ हजार
निधी भानुशाली (सोनू) आठ हजार
गुरूचरण सिंग (सोठी) २८ हजार
डिलनाझ श्रॉफ (रोशन) २२ हजार
समय शाह (गोगी) आठ हजार 
आझाद कवी ( डॉ. हंसराज हाथी) २५ हजार
अंबिका रंजनकर (कोमल) २६ हजार
श्याम पाठक (पोपटलाल) २८ हजार
तरुण उपल (पिकू) सात हजार
घनश्याम नायक (नट्टू काका) ३० हजार
तन्मय वेकारिया (बाघा) २२ हजार
मयुर वाकानी (सुंदर लाल) २० हजार
शरद शुक्ला (अब्दुल) २२ हजार 
दया शंकर पांडे (इन्सपेक्टर चुलबुल पांडे) ३० हजार 

Also Read : तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील बबिता म्हणजेच मुनमुन दत्ता होती या अभिनेत्यासोबत नात्यात... सततच्या मारहाणीमुळे केले होते ब्रेकअप

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Know how Tarak Mehta's reverse glasses are available for every single day in the series.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.