Kiran Kumar unveils his admiration for Salim Khan on The Kapil Sharm Show | ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये किरण कुमारने सलीम खान यांच्याविषयी सांगितली ही खास गोष्ट

‘द कपिल शर्मा शो’ मध्ये किरण कुमारने सलीम खान यांच्याविषयी सांगितली ही खास गोष्ट

ठळक मुद्देसलीम खान यांचा माझ्या आयुष्यावर सगळ्यात मोठा प्रभाव आहे. मी खोडकर असल्याने वडिलांना माझ्या भविष्याबद्दल खूप अनिश्चितता वाटत होती. तेव्हा सलीम साहेबांनी त्यांना मला इंदूरमधील बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवायला सांगितले, ज्यामुळे माझे पूर्ण आयुष्यच बदलून गेले.

कपिल शर्माचा द कपिल शर्मा शो प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. या कार्यक्रमाचा दुसरा सिझन काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला. कपिल शर्मा सोबतच कृष्णा अभिषेक, भारती सिंग, किकू शारदा, अर्चना पुरणसिंग यांसारखे कलाकार या शो चा भाग आहेत.  

द कपिल शर्मा शो मध्ये प्रत्येक आठवड्यात विविध क्षेत्रातील काही मंडळी आपल्याला पाहायला मिळतात. बॉलिवूडमधील अनेकजण या कार्यक्रमात आजवर येऊन गेले आहेत. आता या आठवड्यात बॉलिवूडमधील काही प्रसिद्ध खलनायक हजेरी लावणार आहेत. बॉलिवूडचे खलनायक रणजीत, गुलशन ग्रोव्हर आणि किरण कुमार विनोदवीर कपिलसोबत या कार्यक्रमात खूप धमाल मस्ती करणार आहेत. तसेच कपिलसोबत गप्पा गोष्टी करत बॉलिवूडमधील अनेकांची पोलखोल करणार आहेत.



 

 

द कपिल शर्माच्या या खास भागात किरण कुमारने सांगितले की, त्याच्या आयुष्यावर बॉलिवूडमधील कोणत्याही अभिनेत्याचा नव्हे तर प्रतिष्ठित लेखक सलीम खान यांचा सगळ्यात जास्त प्रभाव आहे. त्याने या कार्यक्रमात सांगितले की, “सलीम खान यांचा माझ्या आयुष्यावर सगळ्यात मोठा प्रभाव आहे. मी लहान असताना खूपच खोडकर होतो. माझ्या वडिलांना माझ्या भविष्याबद्दल खूप अनिश्चितता वाटत होती. तेव्हा सलीम साहेबांनी त्यांना मला इंदूरमधील बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवायला सांगितले, ज्यामुळे माझे पूर्ण आयुष्यच बदलून गेले. 1988 साली सलीम खान यांनी जॅकी श्रॉफ आणि राखी गुलजार यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘फलक’ या चित्रपटातील खलनायकाच्या भूमिकेसाठी माझे नाव देखील सुचवले होते. याच चित्रपटामुळे मला तेजाब मधील ‘लोटीया पठाण’, विश्वात्मा मधील ‘नागदंश’ आणि अशा अनेक खलनायकी भूमिका मिळत गेल्या.




 
द कपिल शर्मा शोच्या या भागात यासोबतच डिंपल कपाडिया, नसिरुद्दीन शाह, सनी देओल, शत्रुघ्न सिन्हा अशा विविध बॉलिवूड अभिनेत्यांबद्दलचे किस्से गुलशन ग्रोव्हर, किरण कुमार आणि रणजीत सांगणार आहे. द कपिल शर्मा शो हा भाग प्रेक्षकांना शनिवार आणि रविवार रात्री 9:30 वाजता सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर पाहायला मिळणार आहे.



 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Kiran Kumar unveils his admiration for Salim Khan on The Kapil Sharm Show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.