KBC: प्रश्न विचारताच हॅंग झाला अमिताभ बच्चन यांचा कॉम्प्युटर, अशी सांभाळली त्यांनी सिच्युएशन...

By अमित इंगोले | Published: October 14, 2020 09:41 AM2020-10-14T09:41:35+5:302020-10-14T09:46:21+5:30

यातील अमिताभ बच्चन यांचा होस्ट करण्याचा अंदाजही वेगळा आहे. गेल्या इतक्या वर्षात फारच कमी वेळा सेटवर अशी स्थिती निर्माण झाली जेव्हा लोक थक्क झालेत. 

KBC Amitabh Bachchan computer hang big b handled situation | KBC: प्रश्न विचारताच हॅंग झाला अमिताभ बच्चन यांचा कॉम्प्युटर, अशी सांभाळली त्यांनी सिच्युएशन...

KBC: प्रश्न विचारताच हॅंग झाला अमिताभ बच्चन यांचा कॉम्प्युटर, अशी सांभाळली त्यांनी सिच्युएशन...

googlenewsNext

'कौन बनेगा करोडपती'चा १२वा सीझन सध्या सुरू  आहे. गेल्या १२ वर्षांपासून सुरू असलेला हा शो लोकांच्या आवडीचा शो आहे. यातील अमिताभ बच्चन यांचा होस्ट करण्याचा अंदाजही वेगळा आहे. गेल्या इतक्या वर्षात फारच कमी वेळा सेटवर अशी स्थिती निर्माण झाली जेव्हा लोक थक्क झालेत. 

मंगळवारी प्रसारित झालेल्या केबीसीच्या एपिसोडमध्ये प्रेक्षकांना असंच काही बघायला मिळालं. मुंबई शहरातील स्वप्नील चव्हाण हॉट सीटवर बसलेला होता आणि अमिताभ बच्चन यांनी प्रश्न विचारायला सुरूवात केली. पण अचानक असं काही झालं झालं जे कौन बनेगा करोडपतीच्या इतिहासात बघायला मिळालं नाही. 

अमिताभ हे स्वप्नीलला २ हजार रूपयांचा प्रश्न विचारणार होते इतक्यात अमिताभ बच्चन यांच्या समोरील कॉम्प्युटर हॅंग झाला. अमिताभ म्हणाले की, पुढील प्रश्न २ हजार रूपयांसाठी तुमच्या कॉम्प्युटर स्क्रीनवर. पण प्रश्न स्क्रीनवर दिसलाच नाही. अमिताभ बच्चन तिनदा म्हणाले की, दोन हजाराचा प्रश्न, दोन हजार रूपये, दोन हजार रूपये.

पण तरीही प्रश्न काही स्क्रीनवर दिसला नाही. तेव्हा अमिताभ बच्चन इकडे-तिकडे बघू लागले आणि म्हणाले दिसत नाहीये. अशात अचानक स्क्रीनवर प्रश्न दिसू लागला. तेव्हा ते म्हणाले आला....आला...त्यानंतर कुठे अमिताभ बच्चन यांनी प्रश्न वाचला आणि स्पर्धकाने त्यावर उत्तर दिलं. हे सगळं काही सेकंदात झालं. पण हा क्षण बघण्यासारखा होता. सोबतच हेही म्हणावं लागेल की, अमिताभ बच्चन यांनी सिच्युएशन फारच चांगल्या प्रकारे हॅंडल केली.
 

Web Title: KBC Amitabh Bachchan computer hang big b handled situation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.