KBC 12 Renuka Shahane gave right answer was Ashutosh her husband name | KBC च्या 'या' प्रश्नात दडलं होतं पतीचं नाव, बघण्यासारखी होती रेणुका शहाणे यांची रिअ‍ॅक्शन...

KBC च्या 'या' प्रश्नात दडलं होतं पतीचं नाव, बघण्यासारखी होती रेणुका शहाणे यांची रिअ‍ॅक्शन...

कौन बनेगा करोडपतीचा १२वा सीझन सुरू आहे. कोरोनामुळे शोमध्ये भलेही काही बदल केले गेले. पण तरीही शोमध्ये स्पर्धकांमध्ये आत्मविश्वास बघायला मिळतोय आणि शोचे होस्त अमिताभ बच्चनही जोशाने हा शो करत आहेत. या शोमधून नेहमीप्रमाणे प्रेक्षकांचं मनोरंजन केलं जात आहे. KBC मध्ये स्पेशल एपिसोड करमवीरमध्ये समाजसेविका फूलबासन देवी यांना बोलवण्यात आलं होतं. त्यांना साथ देण्यासाठी अभिनेत्री रेणुका शहाणे यांना बोलवण्यात आलं होतं. खेळ खेळताना एका प्रश्नाचं कनेक्शन रेणुका यांचे पती अभिनेते आशुतोष राणा यांच्या नावासोबत होतं. यावर रेणुका शहाणे यांची प्रतिक्रिया बघण्यासारखी होती.

KBC 12 मध्ये करमवीर स्पेशल एपिसोड दरम्यान अमिताभ बच्चन यांच्यासमोर छत्तीसगढच्या महिलांना सशक्त करणासाठी संघटना उभारणाऱ्या समाजसेविका फूलबासन देवी होत्या. त्यांची साथ देण्यासाठी आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी अभिनेत्री रेणुका शहाणे आल्या होत्या. खेळात योगायोगाने तिसरा प्रश्न हा रेणुका शहाणे यांच्याशी कनेक्टेड होता. आणि त्यांनी याचं उत्तर देण्यात जराही वेळ लावला नाही. अमिताभ बच्चन यांनी प्रश्न विचारताच रेणुका यांनी लगेच उत्तर देऊन टाकलं. अमिताभ बच्चन हे प्रश्न वाचत होते, त्यांनी उत्तराचे पर्याय देण्याआधीच रेणुका यांनी हसत हसत म्हणाल्या की 'हे तर माझ्या पतीचं नाव आहे'. (KBC मध्ये ५० लाख रूपये जिंकणारी पहिली स्पर्धक ठरली ही महिला, वाचा काय होता ५० लाखाचा प्रश्न?)

काय होता प्रश्न?

- यातील भगवान शिवजीचं असं कोणतं नाव आहे ज्याचा अर्थ जे लवकर प्रसन्न होतं, असा होतो?

याच्या उत्तराचे पर्याय मनमोहन, आशुतोष, केशव आणि माधव असे दिले गेले होते. याचं बरोबर उत्तर आशुतोष हे आहे. रेणुका शहाणे यांनी उत्तर दिल्यावर अमिताभ बच्चन यांनाही हे दिसलं की, या प्रश्नाचं उत्तर देताना रेणुका शहाणे किती आनंदी होत्या. आपणा सर्वांनाच माहीत आहे की, अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी दिग्गज अभिनेते आशुतोष राणा यांच्यासोबत लग्न केलं आहे. आणि दोघांचंही प्रेम-बॉन्डींग नेहमीच वेगवेगळ्या कार्यक्रमात तसेच सोशल मीडियावरून बघायला मिळतं.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: KBC 12 Renuka Shahane gave right answer was Ashutosh her husband name

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.