KBC 12 : This question 50 lakh Guinness world records answer | KBC 12 : गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसंबंधी प्रश्नावर स्पर्धकाने क्विट केला शो, तुम्हाला माहीत आहे का उत्तर?

KBC 12 : गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसंबंधी प्रश्नावर स्पर्धकाने क्विट केला शो, तुम्हाला माहीत आहे का उत्तर?

कौन बनेगा करोडपतीच्या १२व्या सीझनमध्ये सरूवातीपासून महिलांचा दबदबा बघायला मिळाला. एकीकडे आधीच दोन महिला स्पर्धकांनी १ कोटी रूपये जिंकले तर दुसरीकडे केसीबी १२ ला १ कोटी जिंकणारी तिसरी महिला स्पर्धकही मिळणार आहे. याआधी मध्य प्रदेशातून आलेल्या ओशीन जेहरी यांनी केबीसीमध्ये एन्ट्री घेतली. त्या खेळात पूर्णपणे जोशात दिसल्या आणि समजदारीने गेम खेळला. ओशीन शोमधून २५ लाख रूपयांची रक्कम जिंकून गेल्या. ५० लाख रूपयांच्या प्रश्नावर त्यांनी शो क्विट केला. चला जाणून घेऊ काय होता ५० लाख रूपयांचा प्रश्न...

प्रश्न - गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सनुसार, पृथ्वीवर सर्वात मोठी सजीव वस्तू कोणती आहे?

ए- ब्लू व्हेल

बी- जायंट सिकोया

सी- ग्रेट बॅरियर रीफ

डी- हनी मशरूम

बरोबर उत्तर -  डी 

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डशी संबंधित या प्रश्नाचं बरोबर उत्तर पर्याय डी म्हणजे हनी मशरूम होतं. पण ओशीन यांना हे उत्तर माहीत नव्हतं. त्यांना या प्रश्नाचं उत्तर सी म्हणजे ग्रेट बॅरिअर रीफ हे वाटत होतं. पण त्यांनी ही रिक्स घेणं योग्य समजलं नाही. त्यांनी २५ लाख रूपये जिंकले आणि चांगला खेळ खेळण्यावरून अमिताभ बच्चनही प्रभावित दिसले. ('जंजीर' सिनेमासाठी सलीम-जावेद यांनी अमिताभ यांना का निवडलं? च्युईंगमसोबत आहे कनेक्शन....)

ओशीन यांनी सांगितले की, तिला कपिल शर्मा शो फार आवडतो. यावर अमिताभ बच्चन यांनी विचारले की, तुम्ही माझा शो बघत नाही का? यावर ओशीन म्हणाल्या की, बालपणापासून केबीसी बघते. त्यांनी त्यांच्या विश बोर्डवर केबीसीच्या सेटचा फोटो लावला होता. ज्यात ती अमिताभ बच्चन यांच्यासमोर उभी आहे. ओशीन म्हणाल्या की, आज तिचं हे स्वप्न पूर्ण झालं. 
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: KBC 12 : This question 50 lakh Guinness world records answer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.