छोट्या पडद्यावरील अभिनेत्री कविता कौशिक सध्या फिटनेस फ्रिक झालेली पहायला मिळते आहे. तिचा मॉडर्न योगा चाहत्यांना चांगलाच भावतो आहे. कठीण योगा स्टेप करत तिने सोशल मीडियावर सगळ्यांनाच चांगली भुरळ पाडली आहे. तिने चक्क समुद्राच्या काठावर बिकनीमध्ये योगा पोझ करत सगळ्यांना चकीत केले आहे. तुम्हीही तिच्या योगा पोझ पाहून तिचे कौतूक कराल.

कविता कौशिक सध्या अभिनयात फारशी सक्रीय नसली तरी वर्कआऊट आणि इतर गोष्टी करण्यात वेळ देत असते. सोशल मीडियावर तिचा 6 लाखांहून अधिक चाहता वर्ग आहे.

सोशल मीडियावर इतर अभिनेत्रींप्रमाणे कविता कौशिकचाही बोलबाला आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. सध्या फिटनेस फ्रिक बनलेली कविता कौशिक तिचे योगा करत असल्याचे व्हिडीओ फोटो आणि इतरांनाही टीप्स देत प्रेरणा देण्याचा प्रयत्न करत असते.

कविता आणि रोनित यांच्यात चांगली केमिस्ट्री असल्यामुळे तिने लग्न करत आयुष्याशी नवीन सुरूवात केली आहे.

लग्नानंतर सारेच तिला तिच्या फॅमिली प्लॅनिंगबद्दल विचारत होते, अखेर मौन सोडत तिने म्हटले की, कधीही आई न होण्याचा निर्णय तिने घेतल्याचे स्पष्ट केले होते .मी माझ्या मुलावर कुठलाही अन्याय करू इच्छित नाही. 40 व्या वर्षी मी आई होणार असेल तर माझा मुलगा 20 वर्षाचा होईपर्यंत मी वृद्धापकाळाच्या उंबरठ्यावर असेन. केवळ 20 व्या वर्षी माझ्या मुलावर त्याच्या म्हाता-या आई - वडिलांची जबाबदारी यावी हे मला नको आहे असे कविताने सांगितले होते.

Web Title: Kavita Kaushik was spotted doing a bikini hot yoga on the beach, went viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.