Kavita Kaushik quite Facebook | कविता कौशिकने ह्या कारणासाठी फेसबुकला केला रामराम

कविता कौशिकने ह्या कारणासाठी फेसबुकला केला रामराम

ठळक मुद्देफेसबुक हे वेळ वाया घालवणारे माध्यम - कविता कौशिककविता कौशिक इन्स्टाग्राम, ट्विटरवर सक्रीय

 

छोट्या पडद्यावर विविध भूमिका साकारून रसिकांना भुरळ पाडणारी अभिनेत्री कविता कौशिकने एफआयआर या मालिकेतून 
प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. तिने नुकतेच आपले फेसबुक अकाऊंट बंद केले आहे. फेसबुकवर मोठी पोस्ट लिहून तिने आपले फेसबुक अकाऊंट बंद केले आहे. ट्वीटर, इन्स्टाग्राम आणि फेसबुक अशा सोशल मीडियावर कायम सक्रीय असणाऱ्या कविताने फेसबुक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय का घेतला असेल असा तुम्हाला प्रश्न पडला असेल ना.

कविता कौशिकने तिच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘फेसबुक हे वेळ वाया घालवणारे माध्यम आहे. त्यामुळे माझ्या मित्र मंडळींनी, नातेवाईकांनी मला थेट संपर्क साधावा. मी माझे फेसबुक अकाऊंट बंद करत आहे.

पोस्टमध्ये कविताने पुढे लिहिले, ‘फेसबुक हे वेळकाढू माध्यम आहे. जिथे तुमचे मित्र तुमच्याशीच भांडतात. इथे सगळेच दुसऱ्यांकडे वाईट नजरेने बघतात. खास करून एखाद्या अभिनेत्रीला. मी गेल्या अनेक वर्षांपासून या गोष्टीमुळे हैराण आहे. आता असे वाटते की इथे सगळ्यांना कायम अटेन्शन हवे असते. अशी लोक मला कायम कमी लेखण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे आता मी इथे आणखी राहू शकत नाही. मी या प्लॅटफॉर्मसाठी योग्य नाहीये. मी इथून गेल्यानंतर लोक माझ्याबद्दल काहीही बोलू शकतात. खरेतर हे मी खूप आधी करायला हवे होते.’

कविताने फेसबुक जरी सोडले असले तरी ती अजून इन्स्टाग्राम, ट्विटरवर अक्टिव्ह आहे. त्यामुळे या दोन माध्यमातून तिचे चाहते तिच्याशी कनेक्ट राहू शकणार आहेत. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Kavita Kaushik quite Facebook

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.