हॉटसीटवर प्रत्येक सिझनमध्ये असते फक्त शहेनशहाचं राज्य. त्यामुळेच कौन बनेगा करोडपती छोट्या पडद्यावरील रियालिटी शोचा राजाही समजला जातो, शहेनशहा.. अर्थात बिग बी अमिताभ.... ज्ञान हेच तुम्हांला पैसा मिळवून देऊ शकतो ही थीम घेऊन यंदाही केबीसीच्या सेटवर रंगला प्रश्नाचा रंगमंच आणि रसिकांची पुन्हा पसंती मिळाली.
केबीसीला. इतके दिवस सुरू असणारा हा शो आता रसिकांचा निरोप घेणार आहे. येत्या 23 नोव्हेंबरला 'कौन बनेगा करोडपाती'च्या 11 व्या सीजन रसिकांना अलविदा करणार आहे. शोच्या शेवटच्या भागाचे शूटिंग 13 नोव्हेंबरला अमिताभ बच्चन यांनी पूर्ण केले आहे. ज्यासाठी त्यांनी सुमारे 18 तास सलग शूटिंग केले. ज्याबद्दल त्यांनी आपल्या ब्लॉगवरदेखील लिहिले आहे. बींनी आपल्या ब्लॉगमध्ये शूटिंगनंतरचे क्षण आणि मनस्थितीचा उल्लेख केला आहे. सोबतच त्यांनी संपूर्ण टीमचे आभार मानले आहेत.
शूटिंगच्या शेवटी सेटवर असलेल्या प्रेक्षकांना बिग बींनी अभिवादन केले. यानंतर सर्वांनी त्यांना स्टँडिंग ओवेशनदेखील दिले. अमिताभ बच्चन ऑक्टोबरमध्ये हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. त्यानंतर डॉक्टर्सने त्यांना कामातून ब्रेक घेण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर ते कोलकाता इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्येही जाऊ शकले नव्हते. मात्र बिग बींनी सलग शूटिंग करून 3 एपिसोड पूर्ण केले आहेत.
Web Title: Kaun Banega Crorepati season 11 will soon go off Air
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.