‘कौन बनेगा करोडपती’च्या फिनालेमध्ये अमिताभ बच्चनसमोर ढसाढसा रडला युवराज सिंग, पहा व्हिडीओ!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2017 09:06 AM2017-11-05T09:06:02+5:302017-11-05T17:44:03+5:30

बिग बी अमिताभ बच्चन होस्ट करीत असलेल्या ‘कौन बनेगा करोडपती’ या लोकप्रिय शोचा नववा सीजन लवकरच संपणार आहे. येत्या ...

'Kaun Banega Crorepati' in front of Amitabh Bachchan in front of Yuvraj Singh, look at the video! | ‘कौन बनेगा करोडपती’च्या फिनालेमध्ये अमिताभ बच्चनसमोर ढसाढसा रडला युवराज सिंग, पहा व्हिडीओ!

‘कौन बनेगा करोडपती’च्या फिनालेमध्ये अमिताभ बच्चनसमोर ढसाढसा रडला युवराज सिंग, पहा व्हिडीओ!

googlenewsNext
ग बी अमिताभ बच्चन होस्ट करीत असलेल्या ‘कौन बनेगा करोडपती’ या लोकप्रिय शोचा नववा सीजन लवकरच संपणार आहे. येत्या ६ आणि ७ नोव्हेंबरला शोचा फिनाले एपिसोड प्रसारित केला जाणार आहे. ६ तारखेच्या एपिसोडमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा स्टार क्रिकेटर युवराज सिंग आणि अभिनेत्री विद्या बालन सहभागी होणार आहे. सोनी टीव्हीने रिलीज केलेल्या एका टीझर व्हिडीओमध्ये युवराज सिंग खूपच भावुक होताना दिसत आहे. युवराज सांगत आहे की, २०११च्या वर्ल्ड कपदरम्यान माझी प्रकृती खूपच खालावली होती. मात्र अशातही मी जिद्दीने मैदानावर उभा राहिलो. कर्करोगासारख्या आजाराची लागन होतानाही मी आयुष्याच्या लढाईत पराभव स्वीकारला नाही, असे सांगत युवराजला अश्रू अनावर झाले होते. 

६ आणि ७ नोव्हेंबर रोजी प्रसारित होणाºया या एपिसोड्सला ‘अभिनंदन आभार’ असे नाव देण्यात आले आहे. शोमध्ये युवराज सिंगबरोबर ‘तुम्हारी सुलू’ची अभिनेत्री विद्या बालनही सहभागी होणार आहे. दोघेही एकत्र हा गेम शो खेळताना बघावयास मिळतील. जेव्हा युवराजला त्याच्या कर्करोगग्रस्त काळातील प्रश्न विचारण्यात आला तेव्हा युवराजने कर्करोगावर कसा विजय मिळविला हे सांगितले. युवराजने म्हटले की, त्यावेळी माझी प्रकृती खूपच बिकट झाली होती. डॉक्टरांनी तर स्पष्ट केले होते की, आता उपचार करणे अशक्य आहे. अशातही मी २०११ च्या वर्ल्डकपमध्ये देशासाठी आणि सचिन तेंडुलकरसाठी मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. आम्हाला कुठल्याही स्थितीत वर्ल्डकप जिंकायचा होता. युवराजने हेदेखील सांगितले की, जेव्हा मला कर्करोग असल्याचे निदान झाले तेव्हा माझी काय अवस्था झाली होती. 

पुढे बोलताना युवराज म्हणतो की, ‘जेव्हा मी खोकल्यामुळे झोपेतून उठलो तेव्हा खोकताना माझ्या तोडातून रेड कलरचा म्यूकस निघाला. ऐवढेच नव्हे तर १४ सेंटीमीटरचा ट्यूमरही माझ्या तोंडातून बाहेर आला. मात्र अशातही मी माझ्या खेळावर लक्ष केंद्रित केले. माझी प्रकृती सातत्याने खालवत होती. त्यावेळी डॉक्टरांनी मला स्पष्ट केले की, जर माझ्यावर त्वरित उपचार केले गेले नाही तर मला वाचविणे अशक्य होईल. यामुळे माझी प्रकृती आणि खेळ दोन्हीवर परिणाम होऊ लागले. हे सांगताना युवराजच्या डोळ्यातून अश्रू आले होते. त्याला दिलासा देण्यासाठी विद्याने त्याला सावरले. 
 

Web Title: 'Kaun Banega Crorepati' in front of Amitabh Bachchan in front of Yuvraj Singh, look at the video!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.