Kaun Banega Crorepati 11's First Crorepati Reveals What Was 'Irritating' About The Show | हा स्पर्धक सांगतो, कौन बनेगा करोडपतीमधील या गोष्टीचा येतो कंटाळा

हा स्पर्धक सांगतो, कौन बनेगा करोडपतीमधील या गोष्टीचा येतो कंटाळा

ठळक मुद्देकेवळ वेशभुषा काय करायची हे ठरवणे खूपच कंटाळवाणे होते. मला ज्या कपड्यांमध्ये कर्म्फटेबल वाटते, तेच कपडे घालणे मी कधीही पसंत करतो. पण येथे त्याचसोबत कपड्यांचे फिटिंग, त्यांचा रंग या सगळ्या गोष्टींना महत्त्व दिले होते.

कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाच्या प्रत्येक सिझनला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या कार्यक्रमाचा सध्या 11 वा सिझन असून या सिझनला देखील प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे. या कार्यक्रमात नुकतेच सनोज राज हे स्पर्धक हॉट सीटवर बसले होते. त्यांनी या कार्यक्रमात 1 करोड इतकी रक्कम मिळवली. त्यांच्या या कार्यक्रमाच्या चित्रीकरणाच्या अनुभवाविषयी आयएएनएसने दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.

बिहारमध्ये राहाणाऱ्या सनोज राज यांनी या मुलाखतीत सांगितले की, कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात येणाऱ्या स्पर्धकांच्या वेशभूषेवर जी मेहनत घेतली जाते, त्याचा त्यांना प्रचंड कंटाळा आला होता. आम्हा दहा स्पर्धकांना मुंबईतील एका हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते. आम्ही एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स बनलो. या कार्यक्रमाचा अनुभव खूपच चांगला होता. केवळ वेशभुषा काय करायची हे ठरवणे खूपच कंटाळवाणे होते. मला ज्या कपड्यांमध्ये कर्म्फटेबल वाटते, तेच कपडे घालणे मी कधीही पसंत करतो. पण येथे त्याचसोबत कपड्यांचे फिटिंग, त्यांचा रंग या सगळ्या गोष्टींना महत्त्व दिले होते. तुम्ही कपडे काय घालणार यावर प्रचंड मेहनत घेतली जाते. खरे तर हे खूपच चांगले आहे. यामुळे सामान्य व्यक्ती देखील स्क्रीनवर प्रेझेंटेबल दिसतो. या कार्यक्रमाचे होस्ट अमिताभ बच्चन यांना भेटून प्रचंड आनंद झाला. त्यांना मी आजवर केवळ मोठ्या पडद्यावरच पाहिले आहे. पण ते माझ्याशी इतक्या नम्रपणे आणि प्रेमाने गप्पा मारत होते की, ते मला अनेक वर्षांपासून ओळखतात. त्यांची ही गोष्ट मला प्रचंड आवडली.

सरोज यांनी कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात एक करोड रुपये जिंकले. त्यांना इतकी रक्कम जिंकल्याचा प्रचंड आनंद झाला आहे. ते सांगतात, माझी ही कमाई माझी नसून माझ्या वडिलांची आहे. ते एक शेतकरी आहेत. घराच्या परिस्थितीमुळे ते त्यांचे शिक्षण पूर्ण करू शकले नाहीत. पण आम्हाला त्यांनी चांगले शिकवले. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Kaun Banega Crorepati 11's First Crorepati Reveals What Was 'Irritating' About The Show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.