ठळक मुद्देकृष्णा व गोविंदा यांच्या वादाचे कारण ठरले होते एक ट्वीट. कृष्णाची पत्नी कश्मिरा शाहने  एक ट्वीट केले होते.

काही दिवसांपूर्वी कॉमेडियन कृष्णा अभिषेकने मामा गोविंदासमोर परफॉर्म करण्यास नकार दिला होता. कपिल शर्माच्या शोमध्ये गोविंदा पाहुणा म्हणून आला पण, कृष्णाने या एपिसोडमधून गायब दिसला आणि या निमित्ताने गोविंदा व कृष्णा यांच्या कौटुंबिक वादाची पुन्हा चर्चा रंगली.  गोविंदा आपल्या जुळ्या मुलांना भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्येही आला नव्हता, असा आरोप कृष्णाने यादरम्यान केला. मग काय, गोविंदाने एक स्टेटमेंट जारी करून कृष्णाचा आरोप खोडून काढला. गोविंदाच्या या स्टेटमेंटनंतर कृष्णाची पत्नी कश्मीरा शाह हिने उडी घेतली आहे. तिने अप्रत्यक्षपणे गोविंदाला असा काही टोमणा मारला की, सगळेच अवाक् झालेत.

गोविंदाच्या स्टेटमेंटनंतर कश्मीराने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. कश्मीराने ही पोस्ट म्हणायला तिच्या जुळ्या मुलांसाठी लिहिली. पण तिच्या शब्दांचा रोख मात्र गोविंदाकडे होता. मोठे लोक फायदा घेतात. पण मी माझ्या मुलांसोबत असे होऊ देणार नाही, असे तिने या पोस्टमध्ये लिहिले.

कश्मीराची पोस्ट
आपल्या पोस्टमध्ये कश्मीराने कोणाचेही नाव घेतलेले नाही. तिने लिहिले, आयुष्य जगण्याच्या नियमांची कोणतीही गाईडलाईन नाही. पण आयुष्य ही आईची देण आहे आणि आई या नात्याने तुझे रक्षण करणे ही माझी जबाबदारी आहे.  एक आई म्हणून मी असे वचन देते की वैयक्तिक अजेंड्यासाठी तुझा उपयोग करू देणार नाही.  अशा लोकांची सावलीही मी तुझ्यावर पडू देणार नाही. मोठे लोक फक्त तुझा फायदा घेण्यासाठी टपलेले तुला दिसतील. पण तुझी आई जिवंत आहे तोपर्यंत तुझे रक्षण करीन, असे कश्मीराने पोस्टमध्ये लिहिले.

काय म्हणाला गोविंदा...
 जेव्हा कृष्णाचे जुळी मुलं हॉस्पिटलमध्ये होती तेव्हा मी परिवारासोबत त्यांना भेटायला गेलो होतो. माझ्या परिवारातील कोणत्याही सदस्याने त्यांना भेटावे, अशी कश्मीराची इच्छा नसल्याचे मला तिथे असलेल्या नर्सने सांगितले.  मी आग्रह केल्यावर दुस-याच दिवशी आम्हाला दूरून मुलांना बघण्याची संधी मिळाली होती. यानंतर आम्ही जड मनाने तेथून निघून गेलो. कृष्णाला याबाबत काहीच माहीत नाही.कृष्णा आणि कश्मीरा सतत माझ्या विरोधात वक्तव्य करत आहेत. मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत.  कौटुंबिक वाद चव्हाट्यावर येतोय, याचे दु:ख आहे,असे गोविंदाने कृष्णाच्या आरोपांवर उत्तर देताना म्हटले आहे.

असे सुरु झाले होते भांडण
कृष्णा व गोविंदा यांच्या वादाचे कारण ठरले होते एक ट्वीट. कृष्णाची पत्नी कश्मीरा शाहने  एक ट्वीट केले होते. त्यात लोक पैशांसाठी नाचतात असा उल्लेख करण्यात आला होता. हे ट्वीट गोविंदासाठी केले असा गोविंदाच्या कुटुंबियांचा समज झाल्याने त्यांनी कृष्णाच्या कुटुंबियांशी सर्व संबंध तोडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र कश्मीराने हे ट्वीट नणंद बहीण आरती सिंगसाठी (कृष्णाची बहीण)टाकले होते असे स्पष्टीकरण कृष्णाने  दिले होते.


 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: kashmira shah targets govinda in her latest instagram post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.