Kasautii Zindagi Kay 2 fans angry with ekta kapoor for prerna and mr bajaj marriage plot | ही मालिका पाहून भडकले फॅन्स, एकता कपूरला म्हटले मानसिकदृष्ट्या आजारी!
ही मालिका पाहून भडकले फॅन्स, एकता कपूरला म्हटले मानसिकदृष्ट्या आजारी!

ठळक मुद्देएकताच्या प्रत्येक मालिकेत प्रचंड मेलोड्रामा पाहायला मिळतो. ‘कसौटी जिंदगी की 2’मध्येही हेच दिसतेय. आता फक्त टीआरपी चार्टवर याचा फटका एकताला बसू नये, म्हणजे मिळवले.

‘कसौटी जिंदगी की’ या पहिल्या सीझनमध्ये प्रचंड मेलोड्रामा होता. ‘कसौटी जिंदगी की 2’ या दुस-या सीझनमध्ये तर त्यापेक्षा अधिक मेलोड्रामा सुरु आहे. प्रेरणा अगतिक होऊन मिस्टर बजाजसोबत लग्न करते, असे या मालिकेच्या पहिल्या भागात दाखवण्यात आले होते. दुस-या सीझनमध्येही याच प्लॉटची पुनरावृत्ती केली जातेय. प्रेरणाने मिस्टर बजाजसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. मिस्टर बजाजसोबत ती लग्न मंडपातही पोहोचली आहे. पण सध्या तरी हा प्लॉट पाहून लोक भडकले आहेत. इतके की, त्यांनी ‘कसौटी जिंदगी की 2’ची निर्माती एकता कपूरला ट्रोल करणे सुरु केले आहे.
प्रेरणा लाचारी पत्करून मिस्टर बजाजसोबत लग्नासाठी तयार होते, हे लोकांना जराही आवडलेले नाही. सोशल मीडियावरच्या अनेक युजर्सनी यावरून एकताला नाही नाही ते सुनावले आहे. 

एकताने लग्न आणि प्रेमाचा खेळ मांडलाय, असे एका युजरने लिहिले आहे. तर अन्य एका युजरने एकताला थेट मानसिकदृष्ट्या आजारी म्हटले आहे.‘माझ्या मते, एकता मानसिकदृष्ट्या आजारी आहे. तिची नेमकी अडचण काय आहे? आम्ही 2000 मध्ये नाही तर 2019 मध्ये आहोत. ही काय कथा आहे? लहान मुलं ही यापेक्षा चांगली कथा लिहू शकेल,’असे या युजरने म्हटले आहे.
 एकताने  या प्रतिक्रियांतून तरी धडा घ्यावा, असेच अनेकांचे मत आहे. पण त्याची शक्यता कमी आहे. एकताच्या प्रत्येक मालिकेत प्रचंड मेलोड्रामा पाहायला मिळतो. ‘कसौटी जिंदगी की 2’मध्येही हेच दिसतेय. आता फक्त टीआरपी चार्टवर याचा फटका एकताला बसू नये, म्हणजे मिळवले.


Web Title: Kasautii Zindagi Kay 2 fans angry with ekta kapoor for prerna and mr bajaj marriage plot
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.