छोट्या पडद्यावरील खतरों के खिलाडी या रिअ‍ॅलिटी शोची रसिकांना नेहमीच उत्सुकता असते. बॉलिवूडचा दिग्दर्शक रोहित शेट्टी सूत्रसंचालक असलेला हा रिअ‍ॅलिटी शो रसिकांमध्ये लोकप्रिय ठरला आहे. नुकतंच या शोचे 10वे सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या शोमध्ये एक अशी स्पर्धक आहे जिने या शोची ऑफर तब्बल 3 ते 4 वेळा नाकारली होती.

होय, करिश्मा तन्नाने या शोमध्ये जायला तयार नव्हती. मात्र आईने वाढदिवसाचे बर्थ डे गिफ्ट मागितल्यामुळे ती याशोमध्ये सहभागी झाल्याचे तिने लोकमतशी बोलताना सांगितले. माझा स्वभाव तापट आहे आणि माझा मनात भीती असल्यामुळे मी हा शो नकारायला तयार नसल्याचे तिने सांगितले.  मात्र आता करिश्मा प्रत्येक कलाकारांनी या स्पर्धेत एकदा तरी सहभागी व्हायलाच असे आवर्जून सांगते.  


करिश्मा तन्नाने आजवर क्योंकी साँस भी कभी बहू थी, कही तो मिलेंगे, देस में निकला होगा चाँद, शरारत, कुसूम, 'जोर का झटका', 'कॉमेडी नाइट्स विद कपिल', 'बिग बॉस 8', यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे.तिच्या आजवरच्या अनेक भूमिका प्रेक्षकांना आवडल्या आहेत. आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Web Title: karishma tanna refuse to practice in 'khatron ke khiladi 10' last 2 to 3 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.